शांत झालेला ज्वालामुखी


खऱ्या अर्थाने पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन १६ ऑगस्ट रोजी झालं. देशानं आदल्याच दिवशी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता.

वाजपेयींचे मंत्रिमंडळातले खंदे (आणि विश्वासू) सहकारी जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, २९ तारखेला झालं. प्रजासत्ताक दिन साजरा होऊन तीनच दिवस झालेले. पण सोहळा अजून पूर्ण संपलेला नाही. या सोहळ्याचा समारोप आजच्या‘बीटिंग रीट्रीट’ कवायतीनं होत असतो. ‘बीटिंग रीट्रीट’ लष्करी परंपरा आहे. युद्ध संपवून, शस्त्र म्यान करून सैनिक सूर्यास्ताला आपल्या छावणीत परततात, त्या वेळचं संचलन. याच दिवशी आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा.

जॉर्ज फर्नांडिस नावाच्या लढवय्यानं शस्त्र कधीच म्यान केलं होतं. त्याच्या लढायाही संपल्या होत्या. त्याची जाणीव त्यालाही नसावी. नियतीनंच हे केलं होतं. हजारो लोकांना संमोहित करणाऱ्या या नेत्याला स्मृतिभ्रंशाच्या विकारानं कधीचं ताब्यात घेतलं होतं. जॉर्ज फर्नांडिस बरीच वर्षं सार्वजनिक जीवनापासून लांब गेले होते. त्यांचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस ३ जून रोजी झाला. त्यानिमित्त आठवण निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्या दिवशी.

‘शायनिंग इंडिया’ची घोषणा फसली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्रातलं सरकार गेलं. त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , मृत्युलेख​ , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. VinitaYG

      6 वर्षांपूर्वी

    Nice



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen