‘आनंदी’ आनंद!

“I am very glad at this point of my life!’ असं हे 86 वर्षांचे ‘आनंदराव देशमुख’ नावाचे आजोबा म्हणाले! मागच्या आठवड्यात ‘एक तासापेक्षा जास्त मी थांबणार नाही’ या बोलीवर आईबाबांसोबत कसल्यातरी पुजेसाठी माकेगावला गेलो होतो. तिथं मंदिराजवळ काही म्हातारी मंडळी गप्पा ठोकत बसली होती. त्यात यांनी एवढे व्यसनं करून पण अजुन जीवंत आहेत याचं कौतुक चालु होतं. मी आपलं टाइमपास करावा म्हणून त्यांच्यात जाऊन बसलो.( गप्पा ठोकायला आपल्याला वय matter करत नाही) मग थोड्या गप्पा मारल्यावर लक्षात आलं की वरवर अशिक्षित दिसणारा हा म्हातारा 1960 सालचा पोस्ट ग्रेजुएट होता. मग आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की माझ्या एक तासाचे पाच तास कधी झाले तेच कळालं नाही.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 3 Comments

  1. छान

  2. आनंदराव देशमुख यांच्याशी लेखकानं मारलेल्या गप्पा मस्त मजेशीर आहेत. ‘राजकारणात शिकलेली माणसं हवी’ असं विधान सरसकट केलं जातं. साठ वर्षांपूर्वी पदव्युत्तर पदवी मिळविलेले देशमुख मात्र राजकारणातून फेकले गेले. अर्थात त्यांनी स्वतःच तसं होऊ दिलं, हे त्यांच्या बोलण्यावरून समजतं. त्यांच्याहून जास्त शिकलेली माणसंही त्या काळात राजकारणात होती आणि ती तिथं स्थिरावली, जम राखून बसली, हेही खरंच आहे. ‘असला विचार केला असता, तर…’ हे त्यांचं विधान ‘झालं गेलं त्याच्यावर माथेफोड नको’ हे जगण्याचं साधं तत्त्वज्ञान सांगून जातं. या गप्पा अजून थोड्या जास्त असत्या, तरी वाचायला आवडल्या असत्या.

    अनुभवाची भरभक्कम शिदोरी सोबत असलेल्या अशा माणसांशी बोलण्यात मजा येते. माजी मंत्री श्री. बी. जे. खताळ पाटील यांच्याशी गेल्या पाच वर्षांत दोन वेळा अशा गप्पा रंगल्या. आता या महिन्यात ते वयाचं शतक पूर्ण करतील.

  3. वाह कमाल आहेत हे आजोबा

Leave a Reply

Close Menu