कलिंगडाची गोष्ट

वयम्    शुभदा चौकर    2019-04-05 18:50:07   

कलिंगडाची गोष्ट हे शीर्षक वाचून  कलिंगडाविषयी माहिती असणार असं वाटत असेल तर तसं नाहीये. मग नक्की कसली गोष्ट आहे..? त्यासाठी वाचा 'वयम्'च्या  एप्रिल अंकातील हे संपादकीय- वयम् मित्रांनो, मध्यंतरी एक सन्माननीय राजकीय नेते मनोहर पर्रीकर आपल्यातून गेले. त्यांना मी तीनदा भेटले होते. त्यापैकी एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात, २०१५साली. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, ती तुम्हांला सांगावीशी वाटते. पर्रीकर सांगत होते- 'गोव्यातील पर्रा हे माझे मूळ गाव कलिंगडासाठी प्रसिद्ध होते. आमच्या लहानपणी मे महिन्यात गावातील एक शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा ठेवत असे. गावातील सर्व मुलांना सांगितले जाई की, हवी तेवढी कलिंगडे खा! मधल्या काळात मी मुंबई IIT मध्ये शिकायला गेल्यानंतर ६ वर्षांनी परत माझ्या मूळ गावाला गेलो, तेव्हा बाजारात मला पूर्वीसारखी मोठी कलिंगडे कुठे दिसली नाहीत. मग मी त्या आमच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडे कडे कलिंगड महोत्सवाला गेलो. एव्हाना त्या शेतीचा ताबा त्याच्या मुलाने घेतला होता. त्यानेही तेव्हा कलिंगड खाण्याची स्पर्धा ठेवली होती. पण यावेळी छोटी छोटी कलिंगडे तिथे दिसली. आम्ही खायचो तेव्हा तर मोठाली कलिंगडे असत. रसाळ, गोड, उत्तम प्रतीची कलिंगडे खाताना एक वाडगा आमच्या हातात दिला जाई. खाल्लेल्या कलिंगडाच्या बिया त्या वाडग्यात टाका, असे आम्हांला सांगितले जाई. साहजिकच उत्तम प्रतीच्या कलिंगडाच्या बिया त्या शेतकऱ्याकडे जमत. त्या रुजवून परत नवी रोपे लावली जात. अशा रीतीने एकीकडे आम्हा बाल-किशोरांना गोड, आनंदी अनुभव देऊन, शिवाय कलिंगडाचे ते उत्तम वाण त्या शेतकऱ्याकडे ने जपले होते. जेव्हा त्याच्या मुलाने व्यवसाय चालवायला घेतला, तेव्हा त्याने विचार केला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen