पिंकीस पत्र – भाग दुसरा

दि. १०.३.१९

प्रति,
चि.सौ.का. पिंकीस,

तुला पिंकी म्हटलेलं आवडत नाही, हे मला माहित आहे. काय करणार तू माझ्या डोळ्यासमोर येते ती फ्रॉक घालून भातुकली खेळणारीच. मुलं कितीही मोठी झाली तरी नावाचं हे टोपण काही निघत नाही. मूळ नाव टोपणाखाली इतकं झाकलं जातं की ते आठवतच नाही. पूर्वी नवसानं झालेल्या अपत्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला तिरस्करणीय विचित्र नावं ठेवली जात, जसे दगड्या, धोंड्या ,धोंडाबाई, कचऱ्या, केराबाई ही टोपणनावच पुढं काळाच्या ओघात पिंट्या आणि पिंकी झाले आणि टोपण नावाची परंपरा चालू राहिली. परंपरेचा एक अदृश्य चिवट धागा माणसासोबत असतोच.  कितीही मोठा झाले तरी आपल्या मुलांना टोपण नावाने किमान खाजगीत हाका मारायची देखील परंपराच. या परंपरेचा एक पाईक म्हणून तू माझ्यासाठी पिंकीच्!

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

Close Menu