अंतर्नाद दिवाळी २०२०

अंतर्नाद  कशासाठी...

आजकाल कुठेही नजर फिरवा आर्थिक समृद्धीबरोबरच सांस्कृतिक कंगालपणाच्या खुणाही पटकन नजरेत भरतात.
सातासमुद्रापार कुठेही क्षणार्धात संपर्क साधायची सोय असलेला हातातला अत्याधुनिक मोबाइल आणि फ्लॅटच्या बंद दाराआड एकेकट्याने वाढणारी आपली संवादविन्मुख पुढची पिढी. उपलब्ध करून देणे. 'ग्लोबल व्हिलेज'ची अविरत चर्चा आणि एकमेकांच्या बिड चुकूनही कधी पाय न ठेवणाऱ्यांच्या 'कोऑपरेटिव्ह सोसायट्या. नवनव्या उत्पादनांनी ओसंडणारी बाजारपेठ व टीव्हीवरचा रंगीबेरंगी जल्लोष आणि भावनांचे बधिरीकरण व जीवनाचे थिल्लरीकरण.
आर्थिक समृद्धी इतकीच सांस्कृतिक समृद्धीचीही समाजाला गरज असते. ही सांस्कृतिक समृद्धी साहित्याच्या माध्यमातून वाढवण्याचा अंतर्नाद हा एक छोटा प्रयत्न आहे.
दलाल स्ट्रीटवरचे चढउतार आणि शॉपिंग मॉलवरची दिलखेचक प्रलोभने ह्यांच्यापलीकडच्या एका आगळ्या अधिक शाश्वत विश्वात श्रेष्ठ साहित्य आपल्याला घेऊन जाऊ शकते. टीव्हीवर काल काय बघितले, ते कदाचित आज आठवणार नाही, पण वीस-तीस वर्षांपूर्वी वाचलेले मात्र आजही आठवते. मनावर कोरले जाण्याची, संस्कार करण्याची लिखित शब्दांची क्षमता अजूनही उल्लेखनीय आहे.
आज जीवनाचा विविधांगांनी अफाट विस्तार होत आहे आणि साहजिकच साहित्याला समाजव्यवहारात पूर्वीइतके सर्वव्यापी महत्त्वाचे स्थान राहिलेले नाही, हे उघड आहे. परंतु चांगल्या साहित्याची अनेक सामर्थ्यस्थळे आजही लक्षणीय आहेत.
चांगले साहित्य वाचकाला अंतर्मुख करते. त्याचबरोबर त्याची जिज्ञासा व संवादाची भूकही जागवते. जीवनाचे अल्पपरिचित पैलू नजरेसमोर जाणिवेच्या कक्षा रुंदावते, आणून त्याचप्रमाणे त्या सखोल करते; त्याला अस्वस्थ करते, उल्हसितही करते. अशा परस्परविरोधी परिणामांतून ते वाचकाच्या भावविश्वाला व्यामिश्रता आणि अनुभवविश्वाला अर्थपूर्णता देत असते. साहित्य कदाचित स्वतःच्या बळावर समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही, पण ते तशा परिवर्तनाच्या अपेक्षा नक्की निर्माण करू शकते; विकाससन्मुखता जोपासू शकते; एका अधिक चांगल्या समाजाचे स्वप्नतरी जिवंत ठेवू शकते. आपापल्या जगण्यातून प्रत्येक जण शिकतच असतो; साहित्य इतरही अनेकांच्या जगण्याचे सार आपल्यापर्यंत पोहोचवते. मनावर व समाजावर या सगळ्यातून कळत-नकळत संस्कार होत असतात, त्यातूनच सांस्कृतिक समृद्धीही साधली जात असते.
 
ही सांस्कृतिक समृद्धी वाढवणे हे अंतर्नादचे ध्येय आहे. या मूलभूत व्यापक ध्येयाप्रत वाटचाल करण्याच्या दृष्टीने तीन सुस्पष्ट उद्देश 'अंतर्नाद ने पहिल्या अंकापासूनच समोर ठेवले आहेत :

 

१. मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धनाला हातभार लावणे.
२. सकस साहित्याच्या वाचनाची आवड जोपासणे.
३. अन्य माध्यमांतून आज सहसा स्थान न मिळणाऱ्या पण मौलिक अशा वैचारिक व ललित लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
हे तिन्ही उद्देश साधतील अशा प्रकारच्या साहित्यासाठी मासिक हे माध्यम आजही खूप सोयीचे आहे. मासिकातील साहित्य बातम्यांच्या आणि जाहिरातीच्या भाऊगर्दीत हरवून जात नाही. दैनिक वा साप्ताहिकाप्रमाणे घडलेल्या सर्वच घटनांवर घाईघाईने भाष्य करायची मासिकाला गरज नसते. मासिकातील लेखन तात्कालिक महत्त्वापेक्षा, बातमीमूल्यापेक्षा अधिक व्यापक संदर्भावर बेतलेले, चटपटीत शैलीपेक्षा अनुभवाच्या खोलीवर व व्यासंगावर भर शकते. ह्या लेखनासाठी, त्यावर संस्कार करून आवश्यक अशा असू श पुनर्लेखनासाठी पुरेसा वेळ देता येतो. कल्पनेच्या वा विचाराच्या समग्र अभिव्यक्तीसाठी आवश्यक एवढी जागाही मासिकाला देता येते. लेखनादरम्यान चर्चा चिंतनाला वाव असतो. या सगळ्यामुळे साहित्य जास्त परिपक्व बनू शकते. वाचकाच्या वेळेवरही मासिक आक्रमण करत नाही. लेखनाचा योग्य तो आस्वाद घ्यायला, त्यावर विचार करायला आवश्यक तो निवांतपणा मासिकच वाचकाला देऊ शकते.
इंग्रजीचा वा हिंदीचा दुस्वास न करताही मराठी भाषा व साहित्य समृद्ध करता येते, अशी अंतर्नादची धारणा आहे. कुठल्याही प्रकारची सामाजिक, राजकीय, वैचारिक वा साहित्यिक अस्पृश्यता अंतर्नाद पाळत नाही. अन्य कुठल्या नव्या-जुन्या मासिकाशी अंतर्नाद स्वतःची बरोबरी करू इच्छित नाही, स्वतःविषयी अवास्तव दावेही करू इच्छित नाही.
अंतर्नादमध्ये सुधारणांना भरपूर वाव आहे, याची आम्हांला जाणीव आहे. प्रत्येक मासिक हे शेवटी आपापल्या काळानुसार, परिस्थितीच्या मर्यादांनुसार वाचकवर्गानुसार स्वतः संपादकाच्या विशिष्ट अशा पिंडानुसार आणि सर्वांत निर्णायक म्हणजे मासिकात लिहिणारे लेखक शेवटी किती कसदार लिहितात त्यानुसार आकार घेत असते. मराठी साहित्यविश्रापुढच्या आजच्या अनेक गंभीर अडचणी तशा बहुपरिचित आहेत. पण त्या अडचणींवर यथाशक्ति मात करत इतकी वर्षे न चुकता दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अंतर्नादचा अंक प्रकाशित होत आहे.
आपल्याला हा अंक आवडला तर आपणही अवश्य वर्गणीदार व्हावे, शक्य असेल तर जाहिरातींच्या मार्फतही सहकार्य करावे, अंतर्नादची आजवरची वाटचाल ही साहित्यप्रेमींच्या अशाच सहकार्यामुळे शक्य झाली आहे.
 
(अंकात वेळोवेळी छापलेले निवेदन)

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

अंतर्नाद दिवाळी २०२०

जन्म एका कथेचा

विलास पाटील | 19 Nov 2021

कथाबीजातून कथा निर्माण होण्याची प्रक्रिया एकढी सूक्ष्म तरल आणि धुक्याआडची असते, की त्याचा नेमका शोध घेण लेखकालाही अवघड होऊन बसतं, पण एकमात्र खरं, की त्याच्या मनात जे कथाबीज पडतं, त्याचं स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली कथा या दोन्हींचं निरीक्षण नक्कीच मनोरंजक आणि काहीसं कुतूहलपूर्ती करणार असू शकतं

मराठीपणाचे वैश्विक आयाम

ज्ञानेश्वर मुळे | 19 Nov 2021

मानवतेलाच नव्हे, तर चराचराला जोडणारी एकात्मता समजली आणि ती 'एकता' किंवा तो 'योग' मनातून अनुभवला, तर मराठीपणाची विविधता किंवा वेगळेपणा कसा जपायचा, याचे घडे राजकारण्यापासून घेण्याची गरज कुठे आहे?

एक शोधयात्रा...

मिलिंद जोशी | 15 Nov 2021

ऋण फेडायाचे राहून माझे गेले, ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले' म्हणणाऱ्या किणीकरांचे आपणही देणे लागत होतो, हे फार उशिरा कळले." अशा शब्दांत पुलंनी व्यक्त केलेली खंत किणीकरांवर आणि त्यांच्या प्रतिभेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांच्या लेखातून उपटली आहे.

आर्त: अपेक्षा वाढवणाऱ्या सकस कथा

संजय भास्कर जोशी | 15 Nov 2021

माणसामाणसांतली नाती आणि त्यांतला संवाद, असंवाद आणि विसंवाद हा मोनिकाच्या कथाचा शोधविषय आहे. त्यात तर्ककर्कश वाद मात्र नाही आणि नात्यातले सुसंवादही क्वचितच आहेत. आहे तो अभिनिवेशनहीन कुतुहलाने घेतलेला असंवादाचा अन् विसंवादाचा शोध.

मी चोवीस तास

अवधूत परळकर | 13 Nov 2021

"पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू, या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत."

प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत

भानू काळे | 12 Nov 2021

'अदभुत' प्रतिमा केवळ भड़क चित्रणातूनच निर्माण होतात. असे नाही, तर घाईघाईन व्यापक निष्कर्ष काढण्याच्या माध्यमाच्या प्रवृत्तीतूनही त्या निर्माण होतात. सर्वेक्षणे अत्यंत अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याने त्यांचे निष्कर्षही फसवेच असतात; पण वाचकांना मात्र काहीतरी 'महत्वाची माहिती मिळाल्यासारखे उगाचच वाटते.

अखेरचं अवधान

अवधूत परळकर | 12 Nov 2021

"ज्या समाजात वाचन ही बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते; ज्या समाजात ज्ञानपीठविजेत्या व्यक्तीपेक्षा टीव्ही मालिकेतला नवा कलाकार अधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवून असतो, त्या समाजात कुणाही लेखकाला निराशेनं ग्रासलं तर नवल नाही."

आज २००१ साली जयप्रकाश नारायण

निळू दामले | 01 Nov 2021

जेपींना आंदोलनाच्या नेतृत्वपदी का बसवण्यात आलं? भारतीय मानस विचारांचे प्रभाव कमी स्वीकारतं, त्याला व्यक्तीची ओढ, आकर्षण फार असतं. गांधींचे विचार काय होते व ते योग्य होते की नाही याचा विचार करणारे गांधीवादी कमीच.

आयआयटीचे दिवस

सुबोध जावडेकर | 31 Oct 2021

आपलं आहे तेच कसं छान आहे असा प्रचंड आत्मविश्वास आयआयटीयन्स बाळगतात. चांगली गोष्ट आपल्यापाशी असण्यापेक्षा आपल्यापाशी असलेली गोष्ट चांगली आहे हा विश्वास बाळगल्याने माणूस जास्त सुखी होत असावा.

वाईटपणा विकत घेणारा माणूस

मिलिंद जोशी | 30 Oct 2021

साहित्य संस्था समाजाच्या आर्थिक मदतीवर चालतात हे खरे असले तरी पैशासाठी संस्थांनी स्वतःची तत्वे गहाण टाकावीत, तडजोड करावी या गोष्टीला ते कडाडून विरोध करीत असत.

कर तिचे जुळती...

विजया देव | 30 Oct 2021

रंगदेवतेला वंदन करणारे रंगकर्मी कारखान्यातल्या यंत्राला नमस्कार करणारा मजूर, देवळाच्या पायरीला हात लावून तो मस्तकी नेणारा भाविक आणि दगडाला नमस्कार करणारी ही बाई यांच्यातून एक परंपरा वाहत होती.

एका राजाचे निर्गमन

विश्राम शरच्चंद्र गुप्ते | 30 Oct 2021

त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून टाकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा-निळा द्वेष' तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो.

त्या फोटूमदल्या बाईवानी

संजय कृष्णाजी पाटील | 18 Oct 2021

तुमी आनी तुमसे प्वाट पायजे तिकडं निगा , पटत आसल तर बगा, न्हाई तर त्या फोटुमदल्या बाईवानी, नुस्तीच ढिम्म बसून ऱ्हानार हाय बगा उद्यापास्न!

हिंदू आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि मी

गंगाधर गाडगीळ | 08 Oct 2021

मराठी साहित्यातील नवतेच्या पर्वाचे एक प्रवर्तक आणि श्रेष्ठ विचारवंत गंगाधर गाडगीळ आपलं परंपरेशी असलेलं नातं या खास अंतर्नादसाठी लिहिलेल्या लेखात उलगडून दाखवत आहेत.

अंतरिक्ष फिरलो पण...

शांता ज० शेळके | 07 Oct 2021

देह मातीशी बांधलेला पण आत्मा मात्र सतत या आकाशस्थ चैतन्यतत्वाकडे ओढ घेत असलेला अशी दारुण अवस्था माणसाच्या वाट्याला आलेली आहे. ऐहिक आणि पारलौकिक, पार्थिव आणि अपार्थिव यांच्यातील हा संघर्ष सतत चालू आहे आणि मानवाचे हृदय हे त्या संघर्षाचे स्थान आहे.

भरपाई

सदानंद देशमुख | 01 Oct 2021

डोळ्यातली झोप पार उडून गेली होती. मध्यरात्र झाली होती. सारं गाव काळोखाच्या विळख्यात सुस्तावलं होतं. पावसाळी वातावरण बाहेर आभाळ गच्च मेघांनी भरून आलं होतं.
Install on your iPad : tap and then add to homescreen