प्रिय रसिक

पाॅप्युलर प्रकाशनाच्या मराठी विभागाला चाळीस वर्षं पूर्ण झाली त्या वर्षी म्हणजे १९९२ साली दसऱ्याला 'प्रिय रसिक' मासिक सुरू केलं. गेली एकोणतीस वर्षं नियमितपणे प्रिय रसिकचे अंक निघताहेत. पाॅप्युलर प्रकाशनाच्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल आणि पाॅप्युलरच्या नव्वद वर्षांच्या वाटचालीबद्दल रसिक वाचकांना माहिती द्यावी या उद्देशाने हे मासिक सुरू केलं आहे.
पॉप्युलर प्रकाशनाचे हे प्रसिद्ध मासिक लवकरच बहुविधवर उपलब्ध होणार आहे....
‘प्रिय रसिक’ चे सभासदत्व* घ्या.