fbpx

अक्षर मैफल


भाऊ तोरसेकरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले वृत्तपत्र सुरु केले. तो काळ होता १८३० च्या आसपासचा. पेशवाई बुडून ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलात आल्यानंतरची बहुदा पहिली पिढी. त्याकाळी ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘क्लास वन-सुपर क्लासवन’ अधिकाऱ्यांचा पगार रुपयाच्या भाषेत होता. पाच रुपये दहा रुपये असा. त्यावेळी जांभेकर यांनी ‘दर्पण’ची किंमत १ रुपया ठेवली होती. याचा अर्थ जांभेकरांना तोटा नफ्याचं गणित कळत नव्हतं असा अर्थ होतो का, तर नाही. जांभेकर यांना माहिती होतं की (त्यावेळच्या १ रुपया) आपण जो मजकूर देतो आहे त्याची किंमत ‘तेवढी’ आहे. आपण ‘वाचनीय’ मजकूर देतो आहोत याची जांभेकराना खात्री होती. आताच्या वृत्तपात्रांची किंमत ‘कटिंग चहाच्या’ किमंतीपेक्षा कमी आहे याचं कारण त्या वृत्तपत्रांनाही याची खात्री आहे आपण देतोय तो मजुकर लोकं जास्त पैसे देऊन वाचणार नाहीत. ती वाचकाची गरज मला सुद्धा आणि अनेक वाचकांना भागत नसल्याचा अनुभव रोज येत असेल. आजोबा सांगतात ‘आचार्य अत्रे’ चालवत होते ते ‘मराठा’ पूर्ण वाचायला आठवडा पुरत नसे. आजचा पेपर एका चहाबरोबर संपतो. ही वाचकाची गरज भागवणे हे आमचे प्रमुख कर्तव्य असेल. विचार करायला लावतील असे आणि नवीन विचार पुरवतील असे लेख आम्ही वाचकांना देऊ याची मी खात्री देतो. ज्या पत्रकारांची आपण आदराने नावं घेतो ते ‘टिळक, आगरकर, आंबेडकर आचार्य अत्रे, माडखोलकर’ या लोकांच्या निष्ठा लेखणीशी होत्या पैशाशी नाही म्हणूनच आपण त्यांची नावं आदराने घेतो. ‘अक्षर मैफल’ सुरु करताना आमच्यासमोर पत्रकारीतेचा आदर्श म्हणून हीच लोकं आहेत, ज्यांची निष्ठा लेखणीशी होती, आमचाही प्रयत्न तोच असेल.

अक्षर मैफल..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu