fbpx

इ ग्यान-की : पुस्तक परिचय..

आदरणीय सर/मॅडम,

आजवर आपण Gyan-key वाचनालयाच्या उपक्रमातून एकमेकांना भेटत होतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, झारखंड, मध्यप्रदेश व राजस्थान या सर्व राज्यांत मिळून ४,२७० Gyan-key वाचनालये आपण अगदी छोट्यात छोट्या गावांमधील माध्यमिक शाळांमध्ये उभी केली. या वाचनालयांच्या माध्यमातून १० लाखापेक्षा जास्त ग्रामीण विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ४९,००० पेक्षा जास्त शिक्षक यांना मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध झाली. खऱ्या अर्थाने वाचनसंस्कृतीचा प्रसार होतोय.

सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे आपणही Gyan-key वाचनालय उपक्रमाचा परीघ eGyan-key या नव्या उपक्रमाद्वारे विस्तारत आहोत. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल उपकरण आले आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर ही आता अगदी सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. याचाच उपयोग करून आपण eGyan-key या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम पुस्तकांविषयीची माहिती शिक्षकांना व गावकऱ्यांना पुरवणार आहोत.

आपण सर्वांनी आम्हाला जशी Gyan-key वाचनालय उपक्रमात साथ दिली तशीच साथ या eGyan-key लाही द्याल अशी अपेक्षा, नव्हे खात्रीच आहे.
इ “ग्यान-की” चे निशुल्क सभासदत्व हवे असेल तर खालील फॉर्म भरून सभासदत्व घ्या.... आणि वाचनवेडाचा प्रसार करण्याच्या आमच्या या मोहिमेत सहभागी व्हा.

काही अडचण वाटली तर ९७६५५५०८९८ या whatsapp नंबरवर संपर्क करावा ही नम्र विनंती.

बहुविधच्या इतर सभासदत्वांबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा…

इ ग्यान-की सदरातील लेख…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu