‘ग्यान-की’ च्या माध्यमातून ४२७० वाचनालये ग्रामीण भारतात कार्यरत केल्यावर, त्या पुढचं एक महत्वाकांशी पाऊल टाकण्यासाठी आता आम्ही ‘ इ-ग्यान-की’ च्या नव्या अवतारात तुमच्यासमोर येत आहोत.

पुस्तक वाचन ही जरी मुलभूत आणि सार्वत्रिक आवड असली तरी, नक्की काय वाचावे याबद्दल नववाचक किंवा अगदी चोखंदळ वाचक सुद्धा संभ्रमित असतो.

फक्त मराठीचा विचार केला तरी, आजवर हजारो पुस्तके प्रकाशित झाली आणि दर महिन्याला त्यात नव्याने दोन-चारशे पुस्तकांची भर पडत असते. आता या सर्व समुद्रात दर्जेदार साहित्य कसे ओळखावे? आपल्याला ते कोण सांगणार? समजले तरी ही पुस्तके कुठे मिळतील ? असे अनेक प्रश्न वाचकांना पडलेले असतात. अशी असंख्य जुनी पुस्तके सांगता येतील ज्यांना खरेतर भरपूर वाचक मिळायला हवा होता पण तरीही ती तशी अप्रसिद्धच राहिली. अशा पुस्तकांना देखील पुनश्च वाचकासमोर आणायला हवे ही आमची भावना आहे.

नव्या आणि जुन्या उत्तमोत्तम पुस्तकांना वाचकांसमोर आणणारा हा डिजिटल उपक्रम म्हणजे ‘ इ-ग्यान-की’. या अंतर्गत दर आठवड्याला एक म्हणजे दर महिन्याला चार ते पाच पुस्तकांचा परिचय देणारे लेख सभासदांना डिजिटल माध्यमातून वाचता येतील. प्रत्येक सोमवारी एका पुस्तकाबद्दल आपण माहिती देणार आहोत.
पहिला सोमवार- कथा
दुसरा सोमवार- ललित साहित्य
तिसरा सोमवार- कादंबरी
चवथा सोमवार- काव्य आणि उर्वरित इतर सर्व प्रकार जसे प्रवास वर्णन, आत्मचरित्रे, चरित्रे, संशोधन,अनुभव, समीक्षा इत्यादी

या साहित्याची निवड करण्यासाठी अत्यंत प्रगल्भ आणि अनुभवी लेखकांचा चमू ‘ इ-ग्यान-की’ साठी कार्यरत आहे.

तसेच या उपक्रमातून सभासदांना आवडलेल्या पुस्तकांची उपलब्धता आणि विक्री यासंदर्भातली माहितीसुद्धा या पोर्टलवरून मिळत राहील.

चला तर मंडळी, जुन्या व नवीन, दर्जेदार पुस्तकांच्या डिजिटल मेळाव्यात आजच सहभागी व्हा. आणि मराठीतील या अनोख्या प्रयोगाचे साक्षीदार व भागीदार होण्याची संधी हुकवू नका. खरंतर यासाठी आम्ही १०० रुपये वार्षिक एवढे मूल्य ठरवले आहे. पण सध्या पहिल्या हजार सभासदांना आपण हे साहित्य विनामुल्य देणार आहोत. आजच सभासद व्हा..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu