जडण-घडण

जडण घडण मासिक

विद्यार्थी, शिक्षक, पालक

सुसूत्रता आणि सुसंवाद निर्माण करणारी एक शृंखला

शिक्षक, पालक या नात्यानं मुलांचे शिक्षण, त्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचं करिअर हे विषय आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे असतात. झपाट्याने बदलत चाललेली आजूबाजूची परिस्थिती कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला नक्कीच गंभीरपणे विचार करायला लावते की शिक्षणातून नेमकं आपण काय देतो ? आणि मुलं काय शिकतात? ती कशी घडत जातात? ही प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी कशी करता येईल? शिवाय -

बदलती शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम पटनोंदणीचा प्रश्न शिक्षणाचे माध्यम गुणांची स्पर्धा आणि करिअरचा प्रश्न नवेनवे शैक्षणिक प्रयोग करणारे शिक्षक आणि शाळा आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांचा परिचय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी.. स्वावलंबी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं ? शिक्षक, पालक म्हणून या सगळ्या वाटचालीत आपली भूमिका काय ? आपण काय करू शकतो ? मुलांबरोबरच आपणही कसे घडत असतो....... अशा अनेक प्रश्नांची मुळातून उत्तरं शोधण्यासाठी गेली १६ वर्षे 'जडण घडण' मासिकाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

आनंददायी शिक्षणाचे असे नवनवीन मार्ग माहिती होण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या जडणघडणीचा वेध घेणारं, त्यांचा साथीदार बनलेलं. अनेक मान्यवरांचे विचार देणारं एक आगळं-वेगळं मासिक...

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

जडण-घडण

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’

संकलन | 19 Jun 2021

मराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.

पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयाची शताब्दी

डॉ. श्रीपाद जोशी | 27 May 2021

महाराष्ट्र विद्यालय ही शाळा शिक्षण क्षेत्रातील नंदादीप आहे. या शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात कोणत्याही शाळेला आपल्या भावी वाटचालीचा रस्ता नक्की दिसेल.

प्रश्नावलीतील आई

संजय प्रभाकर हळदीकर | 24 May 2021

निवासी शाळेतील मुलींच्या आठवणीची कवाडे उघडली तर त्यांना आठवतात त्यांची घरं... मग ते घर विटांचं असो, मातीचं, झावळ्याचं किंवा झोपडीचं असो... ते त्या प्रेमाने, आतुरतेने आठवतात.
Install on your iPad : tap and then add to homescreen