ललित दिवाळी २०२०

चोखंदळ वाचक ज्या अंकाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'ललित' मासिकाचा ५७वा दिवाळी अंक प्रकाशित करताना आनंद होतो आहे. देशी-विदेशी साहित्य आणि साहित्यिक यांविषयीच्या लेखांनी परिपूर्ण असलेला 'ललित' दिवाळी अंक वाचकांना काही वेगळं वाचन केल्याचा आनंद मिळवून देईल. अनेक नामवंत साहित्यिकांनी नेहमीप्रमाणे 'ललित'साठी आवर्जून लिहिले आहे. वाचक या लेखनाचं स्वागत करतीलच.

वर्गणीदार आणि जाहिरातदार हे कोणत्याही वाङ्मयीन मासिकाचे बळ असते. कोरोनाच्या या आणीबाणीच्या काळातही 'ललित'च्या वर्गणीदारांनी नेहमीप्रमाणे वर्गणी पाठवून दिलासा दिला आहे. अनेक नवीन वर्गणीदारही 'ललित'च्या परिवारात सामील झाले. प्रकाशकांनीही आपल्या जाहिराती देऊन 'ललित'वरचे आपले प्रेम व्यक्त केले. या सर्वांच्या पाठबळावरच तर 'ललित'ने ५७ वर्षांची वाटचाल सुकरतेने केली आहे. या सर्वांचे मनापासून आभार!

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

ललित दिवाळी २०२०

रूपक? नव्हे, चिरंतन सत्य!!

श्रीराम शिधये | 02 Aug 2021

रेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.

84, Charing Cross Road

नीलिमा भावे | 31 Jul 2021

जुनी, दुर्मीळ पुस्तके त्यांच्या मालकांकडून शोधून काढून, ती विकत घेऊन नव्या पुस्तकप्रेमींना (अर्थात किंमत घेऊन) उपलब्ध करून देणारे एक लहानसे दुकान.

मराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे

नीलिमा गुंडी | 30 Jul 2021

अनुवादाद्वारे मराठी साहित्यातील अनेक लक्षणीय कलाकृती मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मराठी कलाकृती वाचल्या जाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

असामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा

प्रवीण दशरथ बांदेकर | 30 Jul 2021

मौखिक इतिहासातून अथवा एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाणतेपणाने सांगितलेल्या आठवणींतून इतिहासातल्या अशा काही व्यक्तींची अशी काही आपल्याला चकित करणारी वेगळी रूपे आपण अनुभवू शकतो. अप्पासाहेबांच्या पुस्तकातूनही असंच तर दिसून येत नव्हतं का?

छायाचित्रणाचा प्रारंभकाळ

दीपक घारे | 25 Jul 2021

ललित, दिवाळी अंक २०२० - छाया-चित्रणाच्या प्रारंभकाळातल्या छाया-चित्रांमुळे आपण आजही अचंबित होतो, सुखावतो आणि इतिहासातल्या अप्रिय घटनांनी स्तब्धही होतो. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी एक ताकद असते. छायाचित्रकलेने ती सुरुवातीच्या काळातच सिद्ध केली होती.

मिथकं सत्यात आणू पाहणारी साहित्यिक - ओल्गा टोकरझुक

संजीवनी खेर | 23 Jul 2021

ललित, दिवाळी अंक २०२०- माणसाने सत्यापासून, वास्तवापासून दूर जाण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी एकप्रकारचा पडदा बनवला आहे. सत्यापासून आपला बचाव करण्याकरिता नि आपल्याभोवती काय चाललंय हे कळूनच न घ्यायचा यत्न असतो.

माझी कथायात्रा : कामतानाथ

कामतानाथ | 22 Jul 2021

टेनिसनची ‘द ब्रूक’ ही कविता होती. ती अभ्यासक्रमात नसल्याने आम्हाला शिकवली नव्हती. पण ती मी जेव्हा वाचली, तेव्हा ती मला खूप आवडली. मी ती कविता कितीतरी वेळा मनातल्या मनात गुणगुणून पाहिली. मग मी त्या कवितेच्या धर्तीवर ‘द रिव्हर’ ही कविता लिहिली. ही माझी पहिली रचना होती. ललित, दिवाळी अंक २०२०

साहित्य : गजांआडचे

मीना वैशंपायन | 20 Jul 2021

कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते.

नाइन्टीन एटीफोर : एक टिपण

वसंत आबाजी डहाके | 18 Jul 2021

जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते.
Install on your iPad : tap and then add to homescreen