ललित दिवाळी २०२०

चोखंदळ वाचक ज्या अंकाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'ललित' मासिकाचा ५७वा दिवाळी अंक प्रकाशित करताना आनंद होतो आहे. देशी-विदेशी साहित्य आणि साहित्यिक यांविषयीच्या लेखांनी परिपूर्ण असलेला 'ललित' दिवाळी अंक वाचकांना काही वेगळं वाचन केल्याचा आनंद मिळवून देईल. अनेक नामवंत साहित्यिकांनी नेहमीप्रमाणे 'ललित'साठी आवर्जून लिहिले आहे. वाचक या लेखनाचं स्वागत करतीलच.

वर्गणीदार आणि जाहिरातदार हे कोणत्याही वाङ्मयीन मासिकाचे बळ असते. कोरोनाच्या या आणीबाणीच्या काळातही 'ललित'च्या वर्गणीदारांनी नेहमीप्रमाणे वर्गणी पाठवून दिलासा दिला आहे. अनेक नवीन वर्गणीदारही 'ललित'च्या परिवारात सामील झाले. प्रकाशकांनीही आपल्या जाहिराती देऊन 'ललित'वरचे आपले प्रेम व्यक्त केले. या सर्वांच्या पाठबळावरच तर 'ललित'ने ५७ वर्षांची वाटचाल सुकरतेने केली आहे. या सर्वांचे मनापासून आभार!

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

ललित दिवाळी २०२०

डेकॅमरॉन ऊर्फ दशदिनांच्या शतकथा

कल्पिता राजोपाध्ये | 02 Sep 2021

फ्लोरेन्समध्ये प्लेगने थैमान घातले होते. ब्लॅक डेथ मुळे सर्वत्र ढिगाने माणसे मृत्युमुखी पडत होती. याच दुर्दैवी काळात घडलेल्या काही घटनांवरून स्फूर्ती घेऊन एका डेकॅमरॉन नावाच्या अजरामर साहित्यकृतीची निर्मिती गिओवानि बोकॅशीओ यांनी केली.

गोष्ट : सुरुवातीची आणि शेवटाची

सुरेखा सबनीस | 30 Aug 2021

गोष्ट’! हा शब्द संस्कृत ‘गोष्ठी’ या शब्दापासून आला आहे. वैदिक काळात ‘विद्वानांच्या चर्चा’ या अर्थाने ‘गोष्ठी’ हा शब्द वापरला जात असे असं म्हणतात. या अगदी उलट मॅक्समुल्लरने दिलेला

नदीपार

नीतिन वैद्य | 25 Aug 2021

सरदेशमुखांची भाषा, त्यातली काव्यात्मकता टीकाविषय झाली आहे, भरजरी भाषेखाली आशय गुदमरला असेही म्हटले गेले आहे. कविता हे सरदेशमुखांचे पहिले प्रेम होते. पण कालौघात कायम तिच्याबरोबर नांदता आले नाही तेव्हा ती अन्य लेखनातूनही वाहती झाली, अशा आशयाचे उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले होते

अंतर्नाद पर्व

स्नेहा अवसरीकर | 25 Aug 2021

एकुणात पंचवीस वर्षे सुरू असलेल्या या मासिकाने यंदा ‘निवडक अंतर्नाद’ स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं आहे. त्यानंतर हे मासिक विराम घेत आहे

कालचा शायर.. आजचा शायर!

डॉ. नंदू मुलमुले | 20 Aug 2021

हा आजचा ‘शायर आहे 165 वर्षांपूर्वी जन्मलेला सैयद अकबर हुसैन अर्थात अकबर इलाहाबादी, आणि त्याची आजही प्रत्ययकारी वाटणारी शायरी आहे किमान दीडशे वर्षांपूर्वीची!

पाडस : पुनर्भेट

वंदना बोकील-कुलकर्णी | 20 Aug 2021

‘पाडस’ या शीर्षकातली सूचकता तेव्हा अर्थातच जाणवली होती. पण आता ती जाणीव अधिक गहिरी झाली आहे, असं वाटतं. निरागस, मुक्त, निरभ्र बाल्य... जसं त्या पाडसाचंही संपलं आणि त्याचा पाडा झाला.

सफदर हाश्मी आणि सडक नाटक

प्रा. अविनाश कोल्हे | 16 Aug 2021

सुधन्वा देशपांडेंचे पुस्तक सडक रंगभूमीची सैद्धांतिक चर्चा करत नसून दिल्लीत कॉम्रेड सफदर हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली रंगभूमीचा हा प्रकार कसा विकसित होत गेला, सुरुवात कशी झाली, विकासाच्या मार्गात कधी व कोणत्या अडचणी आल्या, कोणी कशी मदत केली.. याचे वाचनीय तपशील दिले आहेत.

मुराकामीचा सॅम्सा प्रेमात पडतो...

डॉ. सुहास भास्कर जोशी | 12 Aug 2021

सॅम्सा इन लव्ह’ या कथेतील हे पहिलं वाक्य- ‘तो जागा झाला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं (मनुष्यप्राण्यात) रूपांतर झालं आहे आणि तो ग्रेगॉर सॅम्सा झालाय.’ आता बोला!

गगा

अंबरीश मिश्र | 10 Aug 2021

‘नवर्‍याशी मतभेद झाल्यावर रांगणेकरांची भानुमती घर सोडते, कोकणात सासू-सासर्‍यांकडे जाते आणि ‘कुलवधू’ ठरते. इब्सेनची नोरा घर सोडते आणि बाहेरच्या अनोळखी जगात पाऊल ठेवते. भानुमती मात्र परंपरेची चौकट मोडत नाही. रांगणेकरांतला लेखक इतपतच बंड करू शकला काय?’

पिंगुळीचे कलांगण (वेध: चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या परंपरांचा)

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे | 08 Aug 2021

पिंगुळी येथील ठाकर समाज कळसूत्री बाहुल्यांचे पारंपरिक खेळदेखील पिढ्यान्पिढ्या करीत असून कळसूत्री बाहुल्यांची परंपरा संपूर्ण भारतात दिसते.

धिस इज विंदा

अंजली कीर्तने | 06 Aug 2021

विंदांमध्ये विश्वबंधुत्वाचाही उदय झालेला होता. ते जगाचे नागरिक होते. ‘धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन / धन्य आईन्स्टाईन। ब्रह्मवेत्ता’ असं म्हणत मानवजातीचं कल्याण करणार्‍या, विविध देशांतील थोरांचं त्यांनी स्तवन केलं.

‘तिसरी कसम’चा तख्तहजारा!

मधुकर धर्मापुरीकर | 06 Aug 2021

सिनेमा पाहिल्यावर त्यातले. ‘मारे गए गुलफाम, अजी हां मारे गए गुलफाम..’ हे गाणे ओळखीचे झाले, आवडू लागले, पण या गुलफामचा पत्ता लागला नाही, अर्थ लागला नाही

लेविट आणि डबनर - खोडकर अर्थतज्ज्ञ आणि खट्याळ पत्रकार

विवेक गोविलकर | 05 Aug 2021

अर्थशास्त्रात रस घेणार्‍या लोकांसाठी लेविट आणि डबनर वाचणे अनिवार्य आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना यातून काही नवी दृष्टी मिळू शकेल.

छायाचित्रणाचा प्रारंभकाळ

दीपक घारे | 03 Aug 2021

छाया-चित्रणाच्या प्रारंभकाळातल्या छाया-चित्रांमुळे आपण आजही अचंबित होतो, सुखावतो आणि इतिहासातल्या अप्रिय घटनांनी स्तब्धही होतो. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी एक ताकद असते. छायाचित्रकलेने ती सुरुवातीच्या काळातच सिद्ध केली होती.

रूपक? नव्हे, चिरंतन सत्य!!

श्रीराम शिधये | 02 Aug 2021

रेटून खोटं बोलणं हे सारेच आताच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडलं आहे. अशा काळात तर रूपककथेतून चिरंतन सत्य फार फार प्रभावीपणं मांडणारी ‘अ‍ॅनिमल फार्म’ वारंवार आठवत राहते.

84, Charing Cross Road

नीलिमा भावे | 31 Jul 2021

जुनी, दुर्मीळ पुस्तके त्यांच्या मालकांकडून शोधून काढून, ती विकत घेऊन नव्या पुस्तकप्रेमींना (अर्थात किंमत घेऊन) उपलब्ध करून देणारे एक लहानसे दुकान.

मराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे

नीलिमा गुंडी | 30 Jul 2021

अनुवादाद्वारे मराठी साहित्यातील अनेक लक्षणीय कलाकृती मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मराठी कलाकृती वाचल्या जाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

असामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा

प्रवीण दशरथ बांदेकर | 30 Jul 2021

मौखिक इतिहासातून अथवा एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाणतेपणाने सांगितलेल्या आठवणींतून इतिहासातल्या अशा काही व्यक्तींची अशी काही आपल्याला चकित करणारी वेगळी रूपे आपण अनुभवू शकतो. अप्पासाहेबांच्या पुस्तकातूनही असंच तर दिसून येत नव्हतं का?

मिथकं सत्यात आणू पाहणारी साहित्यिक - ओल्गा टोकरझुक

संजीवनी खेर | 23 Jul 2021

ललित, दिवाळी अंक २०२०- माणसाने सत्यापासून, वास्तवापासून दूर जाण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी एकप्रकारचा पडदा बनवला आहे. सत्यापासून आपला बचाव करण्याकरिता नि आपल्याभोवती काय चाललंय हे कळूनच न घ्यायचा यत्न असतो.

माझी कथायात्रा : कामतानाथ

कामतानाथ | 22 Jul 2021

टेनिसनची ‘द ब्रूक’ ही कविता होती. ती अभ्यासक्रमात नसल्याने आम्हाला शिकवली नव्हती. पण ती मी जेव्हा वाचली, तेव्हा ती मला खूप आवडली. मी ती कविता कितीतरी वेळा मनातल्या मनात गुणगुणून पाहिली. मग मी त्या कवितेच्या धर्तीवर ‘द रिव्हर’ ही कविता लिहिली. ही माझी पहिली रचना होती. ललित, दिवाळी अंक २०२०

साहित्य : गजांआडचे

मीना वैशंपायन | 20 Jul 2021

कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते.

नाइन्टीन एटीफोर : एक टिपण

वसंत आबाजी डहाके | 18 Jul 2021

जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते.
Install on your iPad : tap and then add to homescreen