सोशल मिडीयाचा अर्क

आपल्या whatsapp वर अनेकदा अतिशय सुंदर सुंदर मेसेजेस fwd होऊन येतात.ते इतके छान असतात की त्याच्या निर्मात्याला आपण मनातल्या मनात सलाम ठोकतो. हल्ली तरी त्या मजकुराचे आईबाप कोण आहेत हे खाली लिहिलेलं असतं. पूर्वी तर बिचारे ते पोरकेच या मोबाईलवरून त्या मोबाईलवर फिरायचे. पण त्यात एक इश्यू होता. नंतर कधी आठवल्यावर ते पुन्हा वाचायला जावे तर मिळत नसत. आणि शिवाय सगळेच चांगले मेसेजेस आपल्याला fwd होऊन येतील याची काय शाश्वती? म्हणूनच बहुविध डॉट कॉम ने अशा सगळ्या मास्टर पिसेस चा एक अल्बम बनवला आहे. सोशल मिडीयावरील या सगळ्या 'अर्कांचा' अर्क. या ब्लॉग मध्ये तुम्हाला असे सगळे लेख एकत्र वाचायला मिळतील. शिवाय ते इथूनच तुम्ही शेअरही करू शकाल. त्यावर कमेंटही करू शकाल. आणि ती थेट त्या लेखकाला मिळेल बरं का.. कारण आम्ही त्या लेखकालाच त्या लेखाचे पालकत्व देणार आहोत. त्यामुळे तुम्ही थेट त्यांच्याशी संवाद साधू शकाल.

आपल्यालाही असा चांगला लेख कुठे मिळाला तर ९१५२२५५२३५ या क्रमांकावर fwd करा. निवडक लेखांना इथे प्रसिद्धी दिली जाईल. मात्र त्यात लेखकाचे नाव हवे. नसेल तर ते शोधल्याशिवाय आपल्याला तो इथे टाकता येणार नाही. हे सगळे लेख निःशुल्क आहेत. आपण फक्त नोंदणी करायची आहे. म्हणजे आपल्याला पुढील लेखांची नोटिफिकेशन येत राहतील आणि आलेला लेख कळेल.

‘सोशल मिडीयाचा अर्क’ चे सभासदत्व* घ्या.

सोशल मिडीयाचा अर्क

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.