कोर्ट


भारतीय चित्रपटातून आजवर असंख्य वेळा न्यायालय व तिथे चालणारे खटले याचं अतिरंजित चित्रण आपण पाहिलय. ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘मिलॉर्ड, मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूँ’, ‘तारीख पे तारीख’ असे संवाद आपल्याला अतिपरिचित झालेले आहेत. टोकाचे भ्रष्ट किंवा सत्शील वृत्तीचे न्यायाधीश आणि वकील याच प्रतिमा भारतीय चित्रपटांनी आपल्या मनावर बिंबवल्या आहेत. ‘कोर्ट’मध्ये न्यायाधीश, वकिल, आरोपी, साक्षीदार आणि न्यायालयीन कामकाज सर्वकाही आणि त्यापलिकडचं बरचं काही आहे. पण आपण चित्रपटाच्या माध्यमातून ते पाहिलेलं नाही. आणि हेच ‘कोर्ट’चं प्रमुख वैशिष्ट आहे.

कोर्ट

सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट मध्ये केला गेलाय, यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकानी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडलेत. ‘कोर्ट’ला रुढार्थाने कथा नाही. पण जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात, यातील काही प्रमुख पात्र मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलिकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. amolnirban

      4 वर्षांपूर्वी

    चित्रपट बोर होता. चित्रपटाच्या सादरीकरणात किमान नाट्यमयता ही आवश्यक आहे. पण हरकत नाही. इतके अवॉर्ड मिळालेत म्हणजे आम्हालाच काही समजत नसेल.

  2. milindKolatkar

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम परिचय. पण चित्रपट कंटाळवाणा होता! :-) काहीच घडत नाही. आणि शेवट...!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen