सुरिंदर कपूर प्रेझेंट्स


सुरिंदर कपूर हा पृथ्वीराज कपूर या महान कलावंताचा चुलत भाऊ . पृथ्वीराज कपूर यांच्या कामाचा पसारा वाढायला लागला . हा पसारा सांभाळण्यासाठी त्यांना विश्वासू माणूस हवा होता .कामात मदतीसाठी त्यांनी आपल्या या कामसू धडपड्या चुलत भावाला मुंबईला बोलावलं . सुरिंदर कपूर भावाच्या बोलावण्यावरून मुंबईला आला . चित्रपट निर्मितीच्या कामात पृथ्वीराज कपूर यांना मदत करायला लागला .कामाला वाघ असला तरी स्वतःच मार्केटिंग करण्याची कला सुरिंदरकडे नव्हती . कपूर घराणं म्हणजे कलाकारांची खाण असं समीकरण असलं तरी आपण कलावंत नाहीत ,आपण पडद्यामागेच ठीक आहोत याची दुखरी जाणीव पण सुरिंदर कपूरला असावी . अनेक वर्ष 'नारायण ' गिरी केल्यावर सुरिंदर कपूरने स्वतः निर्माता बनण्याचं ठरवलं .घरातली कुठलीही पाती वेगळं व्हायचं म्हणलं की धुसफूस होतेच . तशी ती कपूर घराण्यात पण झाली .एव्हाना पृथ्वीराज कपूर यांची पुढची पिढी सिनेमात आली होती आणि तुफान यशस्वी पण झाली . निर्माता बनलेल्या सुरिंदर कपूर यांची वाटचाल मात्र अडखळतच चालू होती .अपवाद वगळता यशाचं तोंड सुरिंदर कपूर यांना बघायला मिळालं नाही . पहिले भावाच्या आणि नंतर पुतण्यांच्या सावलीत सुरिंदर कपूर कायमचे झाकोळून गेले .   प्रत्येक परिवारात  एक फारसं काही म्हणणं नसणारा , मान खाली घालून फिरणारा , घरातल्या बहुतेकांचा मिंधा असणारा , आयुष्यात फारस यश न बघितलेला एक बाप -भाऊ -मामा -काका -दादा असतोच .त्याच्या फारस कर्तुत्ववान नसण्याची शिक्षा तो एकटाच भोगत नसतो , तर त्याचा पूर्ण परिवार भोगत असतो . म्हणजे त्याच्या बायका पोरांना फारसं कुणी विचारत नसतं , त्यांच्या मानापमानाकडे लक्ष द्यायला कुणाला सवड नसते आणि अशा कित्येक गोष्टी . नीट बघितलं तर आपल्या आजूबाजूच्या नात् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      5 वर्षांपूर्वी

    फार सुंदर. शेवटचा पॅरा अगदी अप्रतिम

  2. shripad

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद.

  3. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    करा की.. हीच का इतरही केल्यात तर हवं आहे :-)

  4. shripad

      5 वर्षांपूर्वी

    मस्त! फेसबुक वर शेअर केलं तर चालेल का (with a link to this page)?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen