समांतर चित्रपटाच्या प्रदर्शनापुढची बदलती आव्हाने...


समांतर चित्रपटाची वाटचाल अशी आव्हानात्मक परिस्थितीत सुरु झाली. एनएफडीसी अर्थात फिल्म फेडरेशन डेव्हलपमेंट ऑफ इंडियाचे या चित्रपटांना सहकार्य असले तरी अशा चित्रपटांना थिएटर मिळणे गरजेचे  होते. सत्तरच्या दशकात पूर्वार्धात राजेश खन्नाच्या तर उत्तरार्धात अमिताभ बच्चनच्या चित्रपटांनी गल्ला पेटीवर धुमाकूळ घातला असताना आशयघन समांतर चित्रपटांना विविध चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी खेळ यात हुकमी ऑडियन्स असला तरी त्याचे रितसर प्रदर्शनही गरजेचे होते.

समांतर चित्रपटाच्या प्रदर्शनापुढची बदलती आव्हाने...

-दिलीप ठाकूर आजच्या मल्टीप्लेक्सच्या युगात एकाच कॉम्प्लेक्समध्ये चार पाच (कुठे चक्क सात) छोटी मोठी थिएटर्स आणि ‘सिम्बा’, ‘बाहुबली’, ‘साहो’ सारखे मोठे चित्रपट असतील तर काही मल्टीप्लेक्समध्ये तर पहिले तीन दिवस त्याचेच  ‘चोवीस तास’ शो, इतकं आणि असे चित्रपट प्रदर्शन सहज आणि सोपे झाले असले तरी पन्नास वर्षांपूर्वी असे वातावरण नव्हते आणि समांतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी तर बरेच अडथळे/आव्हाने पार करावी लागली. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांत रुजलेला समांतर चित्रपट हिंदीत सत्तरच्या दशकाच्या अगदी सुरुवातीला आला. मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’(१९६९) हा हिंदीतील पहिला समांतर चित्रपट होय. तेव्हाची हिंदी चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांत राजेश खन्नाची प्रचंड क्रेझ होती. इतकी की एक वेळ अशी आली की, मुंबईतील सत्तर टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट सुरु होते. त्यात तो दक्षिण मुंबईतील मेन थिएटरचा जमाना. तेथे दिवसा तीन खेळ याप्रमाणे रिलीज झालेला यशस्वी  चित्रपट तब्बल पंचवीस अथवा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करे. राजेश खन्नाचे तर ओळीने चौदा चित्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख.

  2. SCK@2020

      5 वर्षांपूर्वी

    आता व्यावसायिक चित्रपटातही बरेच वेगळे विषय हाताळले जात आहेत व त्याचा पाया हा समांतर चित्रपटांच्या चळवळीने काही प्रमाणात घातला असे म्हणता येईल. सध्याच्या काळात व्यावसायिक व समांतर चित्रपट अशी विभागणी पुसट होत चालली आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen