चित्रस्मृती


चित्रस्मृती

सिनेमा आठवतोय.... पण दिग्दर्शक?

आपले तरी 'सिनेमाचे जग ' काही विचित्र गोष्टींनी भरलयं आणि म्हणूनच खरं तर कुतूहल वाढतयं.... अशीच एक गोष्ट, अनेक कलाकारांचे  फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन. आणि त्यातही तो चित्रपट लोकप्रिय ठरला, रौप्यमहोत्सवी यश संपादले, तरी पुन्हा त्या कलाकाराने पुन्हा चित्रपट दिग्दर्शन का केले नसावे? येथे एक चित्रपट सुपर हिट ठरल्या ठरल्या निर्मात्यांची लाईन लागते ना? तशा कथा दंतकथा खूप प्रसिद्ध आहेत. असाच एक कलाकार मनमोहन कृष्ण. आजच्या पिढीला या नावाचे कलाकार माहित नसावेत. त्या काळात  चित्रपटात भूमिका साकारत असलेल्याना 'कलाकार ' म्हणत तेव्हाचे ते आहेत. अथवा होते.  ( सत्तरच्या दशकात चित्रपट कलाकारांना 'स्टार ' म्हणायला लागले, आज त्याना 'सेलिब्रेटिज' म्हणतात. हीदेखील प्रगतीच. ) मनमोहन कृष्ण हे खूपच मागील पिढीतील कलाकार आहेत. यश चोप्रा दिग्दर्शित 'धूल का फूल ' ( १९६०) या चित्रपटात  'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा... ' हे गाणे त्यांनी अतिशय प्रभावीपणे साकारले. अब्दुल रशीद ही ती व्यक्तिरेखा होती.  याशिवाय त्यानी नया दौर ( ५७), साधना ( ५८), बीस साल बाद ( ६२), वक्त ( ६५), खानदान ( ६५), उपकार ( ६७), हमराज ( ६७), रामपूर का लक्ष्मण ( ७२), दीवार ( ७५), मेहबूबा ( ७६) अशा असंख्य हिंदी चित्रपटात त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. चरित्र भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य. आणि अशा अनेक पध्दतीची कार्यशैली/स्वभाव असलेल्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारण्याचा दीर्घकालीन  अनुभव असलेल्या मनमोहन कृष्ण यांना चक्क यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मच्या बॅनरखाली 'नूरी ' ( रिलीज ११ मे १९७९) चे दि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. jspalnitkar

      4 वर्षांपूर्वी

    ह्याच संदर्भात प्रहार ची आठवण झाली....माझ्या माहितीप्रमाणे नाना पाटेकरांनी हा एकमेव चित्रपट दिग्दर्शित केला....

  2. jspalnitkar

      4 वर्षांपूर्वी

    ह्याच संदर्भात प्रहार ची आठवण झाली....माझ्या माहितीप्रमाणे नाना पाटेकरांनी हा एकमेव चित्रपट दिग्दर्शित केला....

  3. Rahulmuli

      4 वर्षांपूर्वी

    मनमोहन कृष्ण यांनी हिंदी चित्रपटात पार्श्वगायन ही केले आहे तेही सचिन देव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली.

  4. vilasrose

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.नूरी सिनेमा मस्त मनोरंजक होता.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen