छोटी-सी बडी बात!


१९७०-८० च्या दशकात सारा आकाश, रजनीगंधा, खट्टा -मिठा यासारखे लोकप्रिय चित्रपट निर्माण  करणाऱ्या बासू चटर्जी यांना आदरांजली वाहणारा लेख ...  

छोटी-सी बडी बात!

चित्रपटसृष्टी आणि तिच्या चाहत्यांचं जग म्हणजे एक रणांगण झालं होतं तेव्हा. एकीकडे लोकप्रिय शैलीच्या साचेबद्ध चित्रपटांच्या चिरंतन नशेत जगणारे चाहते आणि दुसरीकडे नव्यानं जन्माला आलेल्या समांतर सिनेमाच्या अर्थपूर्णतेचा, वास्तवदर्शितेचा अभिमान बाळगणारे पुरस्कर्ते. दोघांतल्या वादांच्या रणदुंदुंभींनी आसमंत दणाणून गेला होता. अशात कुठुनसे बासरीचे हलकेसे हळुवार सूर मध्येच ऐकू येऊ लागले होते.... 1970-80 ची दशकं. दोन्हीकडच्या चाहत्यांना शांत करणारे मध्यममार्गी चित्रपट येऊ लागले होते. आणि या दोन्ही प्रतिपक्षांना एकत्र आणण्याची किमया साधली होती त्यांना. या मध्यममार्गियांमधले म्होरके होते ते म्हणजे एक मुखर्जी आणि दोन बासू. हृषिदा, बासूदा आणि बासूदा हे मध्यममार्गी सिनेमाचा मार्ग चोखाळणारे अग्रणी दिग्दर्शक. सामान्य माणसाच्या जगण्यातलं नाट्य ओळखून ते आपापल्या शैलीत रंगवलं या तिघांनी. हृषिदा त्या सामान्य जगण्यातून उदात्ताकडे घेऊन जायचे प्रेक्षकाला. बासू भट्टाचार्य सामान्य स्त्री-पुरुषांतल्या, विशेषतः पति-पत्नी नात्यातल्या सामान्य गुंतागुंतीतले विलोभनीय मानसशास्त्रीय पैलू शोधत राहात. बासू चटर्जी याच शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या जगण्यातलं साधं सरळपण हलक्या फुलक्या मिस्किल शैलीत मांडत. त्यातल्या सूक्ष्म नाट्याकडे प्रेक्षकाचं लक्ष वेधत. समांतर सिनेमातलं वास्तव या मध्यमवर्गीय प्रेक्षकाच्या अंगावर यायचं. अरे बाप रे, ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. savita upadhye

      4 वर्षांपूर्वी

    जूने ते सोने

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    अति सुंदर . आजही या चित्रपटांचं ताजेपणा कायम आहे.

  3. arundate

      4 वर्षांपूर्वी

    ओघवती भाषा आणि माहितीपूर्ण. जुन्या आठवणींना उजळा

  4. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    रेखाताई, वंडरफूल! ओघवतं लिखाण व सहज भाषा...!

  5. jrpatankar

      4 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण.

  6. shripad

      4 वर्षांपूर्वी

    छान आहे लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen