दीर्घा : अभ्यासपूर्ण दीर्घलेख..

दीर्घा सभासदत्व

दीर्घलेखांची ही मालिका खरंच 'खऱ्या' वाचकाला समाधान देईल अशीच आहे. पुनश्च मधील लेख हे साधारण २००० शब्दांचे आहेत. त्याहून मोठ्या लेखांना न्याय देण्यासाठी हा विभाग सुरु केला आहे. जुन्या मासिकांमधील दीर्घलेख मुख्यत्वेकरून यात असतील. यातही आपण अनुभवकथन, चिंतन, इतिहास असे निरनिराळे विषय हाताळायचा प्रयत्न करणार आहोत. १ डिसेंबर पासून हे लेख प्रसारित करायला सुरुवात करणार आहोत. ३१ डिसेंबर पर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी २०० रुपयात वर्षभरात ५२ लेख मिळतील. नवीन वर्षापासून याची किंमत २५० रुपये वार्षिक अशी होईल. यातील लेख खूप मोठे असणार आहेत. ते type करायचा खर्च तसेच याचे लेखकाला मानधनही जास्त द्यावे लागेल. म्हणून प्रती लेख खर्च वाढणार असल्यामुळे ही किंमत ठेवत आहोत. पण लेखांची नावे पाहाल तर काही लेखांमध्येच वर्गणीचे शुल्क वसूल झाल्यासारखे वाटेल याची ग्वाही आम्ही देतो. खाली डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध होणारे लेख देत आहोत. आठवड्याला एक लेख अशी याची वारंवारिता असेल. लेख मालिकेची सुरुवात मराठी माणूस आहोत म्हटल्यावर शिवरायांच्या लेखानेच व्हावी यात काही नवल नाही.

 

 

प्रसिद्ध होणा-या लेखांची यादी :

  • १ डिसेंबर - श्री शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य- लेखक पु ग सहस्रबुद्धे, वसंत दिवाळी १९६०
  • ७ डिसेंबर- यमुनाजळी रंगलेला खेळ - लेखिका मीनाक्षी शिरोडकर अक्षर
  • १४ डिसेंबर- कारवारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रियोळकर मनोहर एप्रिल १९५१
  • २१ डिसेंबर- माहिती- आता लक्ष दक्षिण ध्रुवाकडे केसरी दिवाळी १९६५
  • २८ डिसेंबर- औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ- रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ- अंतर्नाद सप्टेंबर २०१०
  • ०४ जानेवारी- अनुभव- संपादकीय कारकिर्दीतील काही फुले काही काटे
  • ११ जानेवारी- चिंतन- सुमाराची सद्दी : विनय हर्डिकर
  • १८ जानेवारी- विनोद- घरमालकास मानपत्र : पु. ल. देशपांडे
  • २५ जानेवारी- लोककथांचा प्रान्त!- सौ. मालती दांडेकर- खंड ३० अंक ५ सह्याद्रि नोव्हेंबर १९४९
Close Menu