भारताचे पंतप्रधान – श्री. शिवाजी भोंसले?

बारा वाजले होते. जवाहरलालजी आपल्या शयनमंदिरांत अस्वस्थपणें फेऱ्या घालीत होते. खरें म्हणजे या वेळी ते आपल्या सचिवालयांतील कामांत गर्क असायचे; पण आज त्यांचे कामाकडेही लक्ष लागत नव्हते. रात्रीचे साडेअकरा वाजले नाहीत, तोंच ते सचिवालयांतील काम बंद करून शयनमंदिरांत आले.

पप्पांनी आज लवकर काम संपविले, तेव्हा त्यांची प्रकृती बरोबर नसावी असा कयास करून लाडकी इंदिरा पुढे येऊन कांही विचारणार, तोंच तिच्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करून जवाहरलालजी हातवारे करीत आणि पुटपुटत आंत गेले. आजचे लक्षण कांही वेगळे दिसते आहे हे इंदिरेच्या ताबडतोब लक्षांत आले. पण पुढे होऊन पप्पांशी बोलण्याचे धाडस तिला झाले नाही. इंदिरेची ही स्थिती तिथे खाजगी चिटणीसांची काय कथा?

अर्धा तास झाला. बिछान्यावर पडल्यापडल्या झोपेच्या केरसुणीने सगळे विचार डोक्यांतून झाडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्या विचारांनीच झोंप झटकली गेली होती. बाराचे ठोके पडले. जवाहरलालजी उठले. त्यांनी सिगरेटकेस काढून एक सिगरेट शिलगावली. ते सिगरेट क्वचित ओढतात. पण या वेळी सिगरेटच्या धुरांत अस्वस्थता विरून जाईल असे त्यांच्या मनांत आले. सिगरेटची राख झाडता झाडता ‘या प्रांतीयतेची अशीच जाळून राख केली पाहिजे’ असे उद्गार सहज त्यांच्या तोंडून बाहेर पडले.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)
Close Menu