वृत्तपत्रसृष्टीतील आमचा जुना जमाना

पुनश्च    पु. गो. पुणेकर    2019-05-31 10:00:46   

पन्नास-साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत वर्तमानपत्रें फार थोडी निघत होती. मुंबई-पुण्याच्या बाहेर, वर्तमानपत्रे वाचणाऱ्याची संख्या अगदी मर्यादित होती, आणि वर्तमानपत्रे विकत घेणाऱ्या लोकांची संख्या तर त्यापेक्षाही थोडी असे. हल्ली वर्तमानपत्रांचे एजंट्स आणि विक्रेते बहुतेक लहान लहान शहरांतूनही आढळतात. त्यावेळी केवळ पोस्टांतून तेवढीच ज्या त्या वर्गणीदाराच्या नावांवर वर्तमानपत्रे बनवायची. दैनिक वर्तमानपत्रे तर त्या काळी दहा-पंधरा हजार वस्तीच्या गावातील लोकांनाही माहित नव्हती. लिहिता वाचता येणाऱ्या माणसांची संख्या आजच्यापेक्षा किती तरी कमी असे. मराठी चौथी इयत्ता शिकत असता पहिल्याने जे साप्ताहिक वर्तमानपत्र मी नियमितपणे वाचू लागलो त्याचे नाव ‘जगद्वितेच्छु’ (‘सर्वोदय’ कल्पना त्या वेळीही अपरिचित नव्हती!) माझ्या वडिलांच्या सावंतवाडीहून मुंबईला व्यापारानिमित्त दरवर्षी एकदोन खेपा होत असत. एक खेपेस मुंबईमध्ये सदरील वर्तमानपत्र त्यांच्या दृष्टीस पडले. त्यात बातम्या वगैरे मजकूर असून शिवाय मुंबईमधील वारदांच्या पेढीकडून प्रसिद्ध होणारे बाजारभावही त्यात येत, हे पाहून त्या पत्राचे ते वर्गणीदार झाले. ‘जगद्वितेच्छु’ या पत्राचा त्या वेळी बराच खप असे. गावात कित्येकजण ‘केसरी’चे वर्गणीदार होते व त्यामुळे ते पत्र पहावयास मिळे. परंतु माझ्यासारख्या मराठी शाळेतील विद्यार्थ्याला ‘केसरी’ वाचण्याची इच्छा होणे शक्य नव्हते. ‘केसरी’ त्या वेळी आठवड्यातून एकदाच प्रसिद्ध होई. त्यावेळी चार पृष्ठेच होती व जवळजवळ दोन पृष्ठे जाहिरातींनी भरलेली असत. अग्रलेख, ‘पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना’ आणि इतर काही लेख मिळून वाचण्याच्या मजकुराने राहिलेली दोन पृष्ठे भरून जात. बातम्या बहुतेक नसावयाच्याच. क्वचित् एखादी स्थानिक बातमी असा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिकांचा इतिहास , विविधवृत्त , दीर्घा , पु. गो. पुणेकर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen