fbpx

बौद्ध धर्माचा विनाश भाग- २

अंक – पुरुषार्थ – मे १९५५

अशोकाच्या काळात बौद्ध सम्प्रदायाचा सार्वत्रिक प्रचार झाला असला तरी त्याच्या भावी विनाशाला कारणीभूत होणाऱ्या अंतर्गत मतभेदाच्या घुशी बौद्ध सम्प्रदायाच्या भव्य मंदिराला लागल्या होत्या व त्यामुळेच भावी काळांत अवाढव्य विस्तार पावलेला बौद्ध सम्प्रदाय ढासळून पडला.

भगवान् शंकराचार्यांनी बौद्धधर्माचा नाश केला किंवा बौद्धांना भारताबाहेर पिटाळून लावले या सर्वसाधारण समाजात दृढमूल झालेल्या अपसमजाचे सप्रमाण निरसन केले आहे. पण पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की भगवान् शंकराचार्यांच्या प्रयत्नांनी जर बौद्धधर्माचा लोप झाला नाही तर इतर कोणत्या कारणामुळे तो घडून आला? एका काळी अखिल भारतात व्यापलेल्या व अर्ध्या जगाने अंगीकारलेल्या बौद्धधर्माचा भारतातून सर्वतोपरी लोप होण्यास घडलेली कारणे फारच उद्बोधक असली पाहिजेत यात संशयच नाही. बौद्धधर्माच्या नाशाचे बीज कोठे होते व बीजाचे अंकुर हळू हळू कसे फोफावत गेले या प्रश्नाचे उत्तर मोठे मनोरंजक व आजच्या काळाला उद्बोधक असे आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. विश्वास ठेवण्यास कठीण !

Leave a Reply

Close Menu