fbpx

चला जाऊया मंदार पर्वतावर

अंक – किर्लोस्कर, ऑगस्ट १९६३

पुराणांतील वर्णन केलेला मंदार पर्वत आजही विद्यमान आहे. पण पूर्व अफ्रिकेत! एकोणीस हजार फूट उंचीच्या ‘किलिमांजारो’ पर्वतावर आपल्या सौंगड्यांच्या समवेत आरोहण करतांना श्री. केतन शेवडे यांना आलेले गमतीदार अनुभव तुमचे भरपूर मनोरंजन करतील.

जगांत उंच म्हणून नांवाजलेली बहुतेक शिखरे हिमालय आणि आल्प्स पर्वतांत झब्बूशाहीचे गट करून बसली आहेत. त्यांचे दर्शन दुरुन घेतांनासुद्धा किती यातायात. मग प्रत्यक्ष चढाई करणाऱ्या टोळ्यांची काम स्थिती होत असेल! ऊर फुटून पाऊल रेटत नाही, प्रकाशाच्या झगझगाटाने डोळे आंधळे होतात, उंचीने भ्रम होतो आणि थंडीने शरीर लाकडासारखे निर्जीव होते. अखेर वादळाच्या एकाच फटक्याने ते कोलमडून पडतात आणि बर्फाच्या अजस्र लोंढ्याखाली त्यांची समाधी बांधली जाते. फाटक्या तंबूचा कलता खाब हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण दुसरी टोळी येईपर्यंत कुडकुडत उभी असते. माणुसकीचा ओलावा गारठून गेलेले हे पर्वत फार अमानुष आहेत.

त्या मानाने पूर्व आफ्रिकेतला आमचा किलिमांजरो पुष्कळ बरा. एकोणीस हजार फुटांवर उंच असल्यामुळे यानेही बर्फाची कानटोपी घातली आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. साधारण १९६२ च्या डिसेंबरमध्ये केलेल्या चढणीच्या या वर्णनामुळे गिर्यारोहण या शास्त्राबद्दल वा कसबाबद्दल लोक किती अनभिज्ञ होते याची कल्पना येते. अॉक्सिजनचा अभाव किती हानीकारक असतो याबाबतचे सार्वत्रिक अज्ञानही लेख वाचताना जाणवते. अशी आतातायी चढण पूर्ण करून लेखक सहीसलामत परत आले हे सुदैवच!

Leave a Reply

Close Menu