शंभर वर्षांपूर्वींचे चटकदार – तीर्थयात्रा वर्णन

अंक –वाङ्गमय शोभा, मे १९६६

नाशिकचे सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी यथासांग तीर्थयात्रा पुऱ्या केल्या. त्यांची टांचणे, टिपणे बरोबरच्या मंडळींनी ठेवली होती. या साहित्याचा उपयोग करून नाशिक येथील त्यावेळचे विद्वान गणेशशास्त्री लेले यांनी तीर्थयात्रा प्रबंध हे प्रवासवर्णन लिहिले व १८८५ साली नाशिक येथेच छापून प्रसिद्ध केले.

या दुर्मिळ ग्रंथाचे पुनर्मुद्रण, देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्याच्या आधारे हा लेख तयार केला आहे.

शंभर-सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळी प्रवासाची आगगाडीने बहाले केलेली आजची सुखसाधने ज्यावेळी उपलब्ध नव्हती त्याकाळी महाराष्ट्रांतील एक मातबर सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी केलेल्या देशपर्यटनाच्या संबंधींची माहिती, त्यांच्याबरोबर यात्रेस गेलेल्या मंडळींनी टिपून ठेवलेला तीर्थयात्रेचा जमाखर्च व इतर संबंधीच्या माहितीच्या आधारे ‘तीर्थयात्रा प्रबंध’ नांवाचा ग्रंथ रसिकवर्य गणेशशास्त्री लेले यांनी लिहिलेला आहे. प्रस्तावनेंत शास्त्रीबुवा लिहितात की, “या ग्रंथात प्राधान्यें करून तीर्थयात्रांचे वर्णन आहे.  श्रीमंत रघुनाथराव हे पहिल्या प्रतीचे सरदार मोठे उदार. स्वधर्मनिष्ठ व सदाचारसंपन्न असून त्यांजजवळ इंग्रज सरकारीचीही मोठी मेहेरबानगी आहे. त्यांची राजनिष्ठा पाहून चक्रवर्ती महाराणीसाहेब ह्यांनी प्रसन्न होऊन संतोषाने त्यांस ‘कंपॅनियन ऑफ दी मोस्ट एक्झॉल्टेड ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया’ हा किताब दिलेला आहे.” असा मोठा गौरवपर उल्लेख चरित्रकार करतात. उत्तर भारताच्या प्रवासानंतर कांही वर्षानी सरदारांनी दक्षिण भारतभर प्रवास केला तो आगगाडीने. उत्तर भारताचा प्रवास संपूर्ण केला तो इ.स. १८५१ मध्ये तर दुसऱ्या प्रवासास प्रारंभ केला तो इ.स. १८६४ मध्ये. त्याचेही माहितीपूर्ण चित्रण चरित्रकाराने रेखाटले आहे; पण मध्यंतरीच्या कालांत १८५७ सालचे बंड झाले व त्यामुळेच दक्षिणेचा प्रवास पुढे ढकलावा लागला. त्या बंडाचा उल्लेख मात्र कटाक्षाने टाळला आहे! मध्यंतरीच्या काळांत उत्तरेकडून परत आल्याच्या सालीच म्हणजे इ.स. १८५१ मध्ये विंचुरकर यांनी तिसरे लग्न केले. त्यांच्या कनिष्ठ बंधूस सरकारने सदर अमीनीच्या जागेवर नेमले. दुसऱ्या कनिष्ठ बंधूस सन १८५२ मध्ये फुल पॉवर मॅजिस्ट्रेटचा अधिकार दिला व मुंबई कायदे कॉन्सिलांत सभासद नेमले. १८६३ मध्ये वतनदार लोकांचे कायम हक्क ठरविण्याकरिता सरकारने वतन कमिशन नेमले. त्या कमिशनांत मेहेरबान गार्डनसाहेब यास मुख्य नेमून त्याचे मदतीस जे दोन हुषार एतद्देशीय गृहस्थ नेमले त्यांत दादासाहेब विंचुरकर हे होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. हा पराक्रम वाचून, शेजवलकरांनी लिहिलेलं पानिपत पुस्तक आठवले … ह्या सर्व धार्मिक विधीं मुळे चर्चिल साहेबांचे भविष्य मात्र खोटं ठरलं …

Leave a Reply

Close Menu