लोकशाहीत भ्रष्टाचार अटळच आहे का?

पुनश्च    दादूमिया    2019-11-01 10:00:26   

अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या उपोषणाला मिळालेल्या प्रतिसादाचा पदर धरून, काँग्रेस हे भ्रष्टाचाराचे दुसरे नाव आहे हे मतदारांना पटवून देण्यात  भाजपला यश आले, त्यामुळे २०१४ साली देशांत काँग्रेसविरोधी लाट आली. त्यानंतरच्या पाच वर्षात आपण पाहिले की भ्रष्टाचार ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसून सत्तेच्या मातीत नेहमीच भ्रष्टाचाराची शेती फुलते. याचा अर्थ हा की कदाचित आपल्या लोकशाही पद्धतीतच भ्रष्टाचार अपरिहार्य करणारी काहीतरी त्रुटी असली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा या पद्धतीमधील दोषांवरच चर्चा झाली पाहिजे. 'आजच्या काळातला' वाटणारा हा विचार प्रसिद्ध स्तंभलेखक दादूमिया यांनी १९७० सालीच मांडला होता, वसंत  मासिकातील प्रस्तुत लेखात. तो वाचल्यावर  राजकीय भ्रष्टाचारासंबंधीच्या कारणमीमांसेतील किमान काही बाबींवर  नक्कीच प्रकाश पडतो. दादूमिया  म्हणजेच डॉ दामोदर विष्णू नेने. ते बडोद्याला असतात आणि आता वयाच्या नव्वदीत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व हे अनेकानेक विरोधाभासांनी भरलेले आहे. हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ख्याती होती, मात्र ते कुराणाचे अभ्यासक होते. डॉक्टर म्हणून मुस्लिम वस्तीत प्रॅक्टिस करताना त्यांनी लिखाणासाठी दादूमिया हे नाव घेतले. १९७०च्या सुमारास साप्ताहिक सोबत, धर्मभास्कर माणूस यांमधून त्यांनी नियमित लेखन केले. इंदिरा गांधींपासून तर वाजपेयींपर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , वसंत , दीर्घा

प्रतिक्रिया

  1. नितिन श्रीकांत सावन्त.

      4 वर्षांपूर्वी

    या पगारी बुरखेधारी नेत्यांना घरी बसवा.यांच्या पगारापायी जमेल त्या पैशातून सरकारी कर्मचा-यांची बंद केलेली पेन्शन योजना सुरू करा.नेत्यानांही शैक्षणिक पात्रतेचा निकष लावा.

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    परिस्थिती तीच किंबहुना जास्त वाईट आहे. लेखातले आकडे काही शून्य लावून वाचल्यास आजचा लेख वाटेल.

  3. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.1970 मधील खासदाराचे मानधन शेकड्या पासून सध्या लाखात पोचले आहे.कालाय तस्मै नमः लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद झालीच पाहीजे.या मागणीचा पाठपुरावा देशभरात सर्वांनी केलाच पाहिजे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen