श्री शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य


अंक – वसंत दीवाळी - १९६० आतां अवधारा कथा गहन, जे कळा कौतुकां जन्मस्थान कीं अभिनव उद्यान विवेक तरुंचें। ना तरी सकळ धर्मांचें माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचें।। श्रीशिवछत्रपतींच्या क्रातिकार्यांचा विचार करून लागतांच ज्ञानेश्वरांच्या वरील ओव्या मनापुढे उभ्या राहतात. ज्ञानेश्वरांनी त्यांत महाभारताच्या वैभवाचें वर्णन केले आहे. आपण छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास केला तर शिवभारताच्या वर्णनांतही ही शब्दश्री तितकीच सार्थ होईल हे आपल्या ध्यानी येईल. आणि पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची भव्य आकांक्षा चित्तामध्ये सामावून घेणाऱ्या महापुरुषाच्या चरित्राचे निरूपण करण्यास पंधराव्या वर्षीच भावार्थदीपिका रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या रसिक, अमृत अक्षरांहून अन्य शब्द तरी कोठून आणावे? ‘हिंदवी स्वराज्य’ या महासंकल्पाचें जें स्फुरण महाराजांच्या चित्तांत झाले त्यानेच सतराव्या शतकापासून पुढचा भारताचा सर्व इतिहास पालटून गेला. पूर्वीच्या काळीं हिंदूंची अत्यंत विशाल अशी साम्राज्यें होती. चंद्रगुप्त, अशोक यांच्या साम्राज्यांत बलुचिस्तान, अफगाणिस्तान व त्यालगतचा प्रदेश यांचा अंतर्भाव झालेला होता. पुढे शक, यवन, युएची, हूण यांचा पराभव करून त्यांची आक्रमणें मोडून काढणारे पुष्यमित्र, पुलुमायी शातकर्णी, समुद्रगुप्त, श्रीहर्ष यांनीही हिंदुस्थानांत मोठमोठी साम्राज्यें स्थापन केली होती. त्यामुळेच भारतांत त्या काळांत सुवर्णयुग निर्माण झाले होते. आणि भारतीयांची कीर्ति दिगंत पसरली होती. या काळांत हिंदूंच्या वैदिक धर्माच्या जोडीला बौद्ध व जैन हे धर्म भारतांत नांदत होते. त्या धर्माचे अनुयायी असलेले राजे आणि सम्राटही भारतांत अधिराज्य चालवीत होते. सम्राट अशोक, कलिंगर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , समाजकारण , वसंत , दीर्घा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen