गहकूटं विसङ्गीतं

“Home is a place you grow up wanting to leave, and grow old wanting to get back to.” असं एक इंग्रजी वचन आहे. छोट्यासा गावात, निसर्गाच्या कवेत बालपण घालवताना आपण ऐहिक प्रगतीच्या वाटेनं ते घर, परिसर सोडून जातो. परंतु कालांतरानं त्या प्रगतीची सवय झाली की पुन्हा मनानं त्या परिसरात रेंगाळू लागतो. कमीअधिक प्रमाणात हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. परंतु प्रतिभेचे लेणं लाभलेली व्यक्ती ते ज्या पद्धतीनं, तऱ्हेनं सांगू शकते तसं ते केवळ त्यांनाच शक्य आहे. भावनांचे मौनराग गाऊन मराठी शारदेची वीणा झंकारणाऱ्या महेश एलकुंचवारांनी  वऱ्हाडात पांढरकवड्यानजिक असलेल्या त्यांच्या पारवा या गावातील त्यांचा वाडा आणि परिसर, ते गाव बालपणीच सोडल्यावर सतत मनात बाळगला होता. तब्बल ३८ वर्षांनी ते पुन्हा त्या परिसरात गेले आणि वाडा पाहिला, तेव्हा झालेली त्यांची मनःस्थिती या लेखात त्यांनी शब्दबद्ध केली आहे. परंतु ती मनःस्थिती म्हणजे या शब्दमैफलीतील गाण्याची उत्तुंग अखेर आहे. त्यापूर्वी रागाची भूमिका सांगताना त्यांनी केलेला प्रस्तावनारूपी स्वरविस्तारही तेवढाच वेधक, मोहक आहे. १९९० साली मौजेच्या दिवाळी अंकात आलेला हा लेख म्हटले तर २९ वर्षे जुना आणि म्हटले तर ज्याला जुनेपणाचा कधीही स्पर्शच होणार नाही असा-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

  1. छान

  2. अतिशय सुंदर , खुप मजा आली

  3. ५५ ते ६० वर्षापूर्वीच्या कोकणातील माझ्या छोट्याशा गावातील हळव्या हृद्द्य स्मृती लेखकाने जागृत केल्या. वाचताना सारखे डोळे पाणावत होते. १५० वर्षापूर्वीचे घर ,त्याच्या मोठमोठ्या तुळया ,तिन्हीसांजा लावलेले कंदील, छोटे दिवे, मधेच फिरणारी वटवाघळे, रातकिडे ,म्हटलेल्या परवचा, ओउटकि पर्यंतचे पाढे , जनावरांचा गोठा, हम्बरणारी गुरे वासरे, दुध काढणारी आई हे सर्व आठवले. एकेकाळी
    जगलेल्या वेगळ्याच विश्वाची सफर लेखकाने घडवून आणली . खूप खूप धन्यवाद.

  4. माझ्याच विचारांचे आणि अनुभूतींचे शब्दांकन वाटावे, असा लेख. काही सूक्ष्म तपशील वगळता, अनेक अनुभव अगदी हुबेहूब. आजच सकाळी माझ्या आजोळच्या घराचे आणि परिसराचे फोटो भावाने whatsapp वर टाकले आणि संध्याकाळी हा लेख वाचला…पुन्हा त्याच भावना पुन्हा अनुभवल्या…काय योगायोग..!

  5. खुप सुंदर लेख … वाचताना सतत गळ्याशी आवंढा येत होता …डोळे भरून येत होते …माझ्याही अशा आठवणी आहेत , वयाच्या ८ व्या वर्षा पर्यंतच्या …त्या पुन्हा जिवंत झाल्या … पण एलकुंचवारi सारखे प्रतिभेचे लेणे एखाद्यालाच लाभलेले असते … शब्दातून त्यांनी अक्षरशः डोळया समोर चित्र उभे केले आहे …

Leave a Reply

Close Menu