यात्रा पुढे सरकताना !

साहित्य माणसाच्या जगण्यात आणि जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात असतं. साहित्यिक म्हणून मध्यमवर्गीय आयुष्य आणि ‘व्हाईट कॉलर जॉब’ करणारेच बहुसंख्य होते आणि आहेतही. तसं असणं हा काही कमीपणा नाही, परंतु एकाच वर्गातील लोकांच्या साहित्यामुळे साहित्यात तोचतोपणा येण्याची शक्यता मात्र असते. याला छेद देणारे अनेक प्रयोग मराठीत झालेले आहेत. न्हाव्याचा व्यवसाय करणारे राम नगरकर यांनी लिहिलेले ‘रामनगरी’, सिताराम मेणजोगे यांनी लिहिलेले ‘पोस्टातली माणसे’ किंवा डॉ रवी बापट यांचे ‘केइएम वॉर्ड नंबर ५’ या पुस्तकांनी मराठी साहित्याला वैविध्य दिले. प्रस्तुतचा लेख त्याच पद्धतीचा आहे.

रेल्वेचा प्रवास आपल्या सर्वांना प्रसंगपरत्वे करावाच लागतो आणि दीर्घ रेल्वे प्रवास, त्यात भेटणारे सहप्रवासी यांची अनेक वर्णने साहित्यात आढळतात. परंतु मोटरमनला रेल्वे जशी आणि जेवढी समजते तशी ती कोणालाच समजणे शक्य नाही. मोटरमन हा आपल्याला केवळ यंत्रवत चालक वाटत असतो. बसला आणि चालवली गाडी, त्यात काय? परंतु संपूर्ण रेल्वेचंच अंतरंग उलगडून दाखवणारा आणि मोटरमनकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आरपार बदलवून टाकणारा हा लेख  खुद्द  ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या गणेश मनोहर कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. खरे तर या लेखात एक पुस्तक दडलेले आहे-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. एखादं सुंदर गाणं ऐकत असल्याचा भास होत होता .

 2. लेख वाचून थक्क झालो. रेल्वे कर्मचारी कुठच्या कठीन परिस्थितीत काम करतात हे “जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे” अनेक गोष्टींची आपण कल्पनाही केलेली नसते. BBC आणि National Geographic यांनी भारतीय रेल्वेवर माहितीपट बनविले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनवर देखील माहितीपट आहे. त्याच्या link खाली देत आहे.

  https://www.youtube.com/watch?v=PM8kbyaa8sA
  https://www.youtube.com/watch?v=9ZgjglPEYrU

  यामुळे रेल्वेच्या या अवाढव्य कारभाराची ब-यापैकी कल्पना आली. एक मात्र झाले की रेल्वेची अनियमितता किंवा गाड्या बंद पडणे-विशेषत: पावसाळ्यात- अशा कुठच्याही गोष्टीसाठी रेल्वेला दोष देणे बंद केले. अपुरे मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता असताना देखील रेल्वेचा कारभार उत्तम प्रकारे चालू आहे याचे कौतुकच आहे.
  हीच गोष्ट BEST ला सुद्धा लागू होते.

 3. Excellent
  Very very good

Leave a Reply

Close Menu