दुसरे पर्व

सत्यशोधक चळवळीचा साधार व सविस्तर इतिहास अद्याप लिहिला गेला नसल्यामुळे महात्मा जोतीराव फुल्यांच्या मृत्यूनंतर (२७ नोव्हेंबर १८९०) तीस वर्षांनी शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने व साहाय्याने ‘ब्राह्मणेतर संघ’ या संघटित राजकीय पक्षाची स्थापना (१२ डिसेंबर १९२०) होईपर्यंतच्या कालखंडातील सत्यशोधकांच्या चळवळीबद्दल आज कोणास फारशी माहिती असल्याचे दिसत नाही. सत्यशोधक चळवळीच्या इतिहासातील या जवळजवळ अज्ञात कालखंडावर डॉ. गेल ऑमवेत यांनी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. हा अपवाद वगळला तर आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील या कालखंडाकडे अन्य अभ्यासकांचे अजून लक्ष गेलेले दिसत नाही. या कालखंडाच्या अभ्यासास उपयुक्त ठरतील अशी साधने धुंडाळल्यानंतर आजवर जी माहिती हाती लागली, तिच्या सहाय्याने सत्यशोधक चळवळीतील चढउतार, ताणतणाव, नेत्यांची धोरणे व डावपेच, त्यांचे वैचारिक व व्यक्तिगत मतभेद, त्यामुळे व बाह्य परिस्थितीमुळे सत्यशोधक चळवळीच्या मार्गात आलेल्या अडचणी व आपत्ती यांचे, अपुरे का होईना, चित्र रेखाटणे शक्य आहे असे वाटते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. सत्यशोधक चळवळी चे Brahmin- Brahmin इतर वादात रुपांतर झाले .हीच त्या चळवळीची खरी शोकांतिका.

  2. ह्यातली खूपशी माहिती नव्हती, लेख पुन्हा प्रकाशात आणल्या बद्दल धन्यवाद

Leave a Reply

Close Menu