डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, एम्.ए.पीएच्.डी.

“महाराष्ट्रीय ज्ञानकोश”कार व ‘ब्राह्मण कन्या’दि कादंबऱ्यांचे कर्ते, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, यांची या वर्षी महाराष्ट्रीय साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदावर योजना झाली असल्यामुळे त्यांचे चरित्र व कार्य याबद्दल अनेक वाङ्मयप्रेमी रसिकांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली असण्याचा संभव आहे.

मराठी भाषेच्या अभिवृद्ध्यर्थ आजपर्यंत ज्यांनी काही महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यामध्ये डॉ. केतकर यांचे वास्तविक स्थान फारच उच्च आहे. डॉ. केतकर यांची वाङ्मयनिर्मिती विविध प्रकारची असून त्यांच्या लिखाणात नाविन्य व स्वतंत्र विचार ओतप्रोत भरलेले असतात. त्यांची साहित्य-सेवा वाङ्मयनिर्मितीपुरतीच मर्यादित नसून, लेखनव्यवसाय व धंदेशास्त्र यांची सांगड त्यांनी आपल्या आयुष्यक्रमात घालून दाखविली आहे. यामुळे त्यांचे चरित्र जितके उद्बोधक तितकेच उपयुक्तही होण्यासारखे आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

Close Menu