शतकापूर्वींचे हैद्राबाद

इ. स. १८०० मध्ये इंग्रजांनी हैद्राबादच्या निजामाबरोबर तैनाती फौजेचा तह करून त्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. त्यावेळी हैद्राबादच्या गादीवर निजाम अलीखान हा असून मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध असलेला मुशीरुल्मुल्क हा दिवाण होता. केवळ मराठ्यांच्या भीतीमुळे मुशीरुल्मल्काने इंग्रजांबरोबर तह घडवून आणला.

या तहाप्रमाणे इंग्रजांनी हैद्राबादचे परचक्रापासून रक्षण करण्याची जबाबदारी पत्करली. इंग्रजांची तैनाती फौज सिकंदराबाद येथे राहू लागली. या फौजेच्या खर्चाकरिता निजामाने, म्हैसूरच्या युद्धात त्याच्या वाट्यास आलेले कदपा, कर्नूल, अनंतपुर, बल्लारी हे जिल्हे इंग्रजांना लावून दिले. या तहांतील कलमाप्रमाणे युद्धप्रसंगी निजामाने पण सहा हजार पायदळ आणि नऊ हजार घोडेस्वारांसहित इंग्रजांना मदत करावी असे ठरले होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu