वाचनकलचे मर्म

वर्तमानपत्रे वाचणे हे इंग्रज लोक सकाळी जसा चहा घेतात त्यासारखेच पुष्कळ अंशी होय. म्हणजे अर्धे पोषण, अर्धी करमणूक असाच दोहोंचा प्रकार आहे. शरीराचा निर्वाह होऊन त्याचे यथास्थित पोषण होण्यास जसे चांगले जेवणच पाहिजे त्याप्रमाणेच खरी उपयोगाची अशी विद्वत्ता ज्यास संपादन करणे असेल त्याने मोठमोठ्या नानाविधविषयक ग्रंथांचा उहापोहपूर्वक यथास्थित व्यासंगच केला पाहिजे. हे परिश्रम केल्याने आलेला शीण घटकाभर दूर करण्यास व जगात काय उलाढाली चालल्या आहेत त्या समजण्यास वरील पत्रांचा आदर करणे बरोबर आहे; पण त्यास विद्येच्या शिखरावर बसवून ठेवणे हे अगदी शोभत नाही…

ग्रंथवाचन करणे माणसाच्या चौफेर प्रगतीस कसे गरजेचे आहे हे सांगताना मुळात वाचन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असते, वाचन करावे कसे, त्याचे हेतू काय असू शकतात या मुद्द्यांवर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेला हा विस्तृत लेख. या लेखाचे महत्त्व आजही अबाधित हे यात लेखकाचे द्रष्टेपण कारणीभूत आहे की आपल्या सुशिक्षित समाजाचे दळभद्रीपण, असा प्रश्न जरुर पडतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. अतिशय सुंदर लेख! मला तर फारच आवडला.
    परंतु असे लेख फेवरेट मध्ये अॅड करता येतील अशी व्यवस्था लवकर लवकर उपलब्ध करून दिल्यास आनंद होईल..

Leave a Reply

Close Menu