निवडक दिवाळी २०१८

मराठी वाङमयीन परंपरेतील एक अनोखा उपक्रम म्हणजे दिवाळी अंक. 150 वर्षांपूर्वी बंगालमधे दुर्गापुजेनिमित्त निघणाऱ्या विशेषांकांपासून मनोरंजनकार मित्रांनी प्रेरणा घेतली आणि मराठी दिवाळी अंक जन्माला आला.मुद्रित साहित्याचा वेलू बहरात असताना दिवाळी अंकांनी मराठीला अनेक दर्जेदार लेखक,साहित्य आणि साहित्यप्रकार मिळवून दिलेच.पण बोलपटांपासून ते नेट सिरिज पर्यंत व्हाया दूरदर्शन मालिका दृकश्राव्य माध्यमांचे क्षितिज विस्फारत असतानाही दिवाळी अंक निव्वळ टिकून राहिले नाहीत तर साहित्याचा प्रवाह समृध्द करत पुढे नेत राहिले.आज सुमारे तीनशेहून अधिक मराठी दिवाळी अंक प्रकाशित होतात. ते सगळे अंक सगळ्या वाचकांच्या परिघात येणं जरा कठीणच. म्हणून डिजिटल माध्यमातून यातील निवडक अंकातील वेचक साहित्य वाचनवेड्यांपर्यंत नेण्याचा उपक्रम म्हणजे निवडक दिवाळी २०१८.

या विभागात २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या निवडक दिवाळी अंकातील वेचक लेख,अनुभव कथन,कथा,माहितीपर लेख वाचता येतील. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळामध्ये दर महिन्यात साधारणतः सहा लेख सादर केले जातील.त्यामुळे सगळे दिवाळी अंक जरी वाचता आले नाही तरी निवडक अंकातील काही साहित्याचा आस्वाद घेतल्याचा आनंद नक्कीच मिळेल. या विभागाचे शुल्क रु.२००/- मात्र आहे.या शुल्कामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात २०१८च्या दिवाळी अंकातील एकूण ५२ लेख/कथा वाचायला मिळतील.

येणारे लेख –

१) मैत्री एकाकीपणाशी — प्रवीण दवणे – थिंक पॉझिटिव्ह — 3 Jan.2019
२) बॉर्डरलगतचं जगणं — मुक्ता चैतन्य – अक्षरलिपी — 7 Jan.2019
३) व्हिक्टोरिया क्रॉस — शैलेंद्र शिर्के – धनंजय — 10 Jan. 2109
४)सेन आणि नॉनसेन्स — शरद वर्दे – किस्त्रिम – 14 Jan. 2019
५) रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये – भानू काळे – अंतर्नाद 17 Jan.2019
६) विवियन मेयरच्या शोधात — नितिन दादरावाला – महाअनुभव 24 Jan.2019

निवडक दिवाळी २०१८ सदरातील प्रसिद्ध लेख

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu