पुनश्च ते बहुविध : असेही एक संक्रमण

संपादकीय    किरण भिडे    2019-01-16 18:00:51   

नमस्कार. ३० सप्टेंबर २०१७  ला पुनश्च सुरु केल्यापासून आजचा हा पहिला बुधवार असेल ज्यादिवशी बरोबर सकाळी सहा वाजता पुनश्च website/app वर सशुल्क लेख प्रसिद्ध होत नाहीये. गेले काही दिवस सतत मेसेजेस पाठवत आहोत त्याप्रमाणे आता यापुढे पुनश्च चे सशुल्क लेख बहूविध च्या वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होतील. पुनश्च च्या सर्व वर्तमान सभासदांचा data login सकट बहूविध वर यशस्वीपणे आणल्यानंतर दोन दोन साईट्स, apps चालवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे आता पुढचा सशुल्क चा १६ जानेवारीचा लेख बहूविध वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होईल. आज हे लिहिताना संमिश्र भावना मनात आहेत. या सर्व प्रवासाचे साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर त्या मांडायलाच हव्यात. गेले जवळपास दीड वर्ष पुनश्च च्या वेबसाईट आणि app वर मी आणि विनय सामंत ने अथक परिश्रम घेतले होते. सुधन्वा ने त्याच्या परीने सर्व लेख छान सजवले होते. तंबी आणि डॉ यश यांनी पुनश्च वर लेखन करून त्याला आणखी प्रतिष्टा दिली. सर्व गोष्टी खूप छान जमूनही आल्या होत्या. वाचकांना या गोष्टी वापरण्याची सवय लागत होती. सर्व काही उत्तम सुरु होतं. असं असताना हे बहुविध च काय काढलं? असं कोणीही विचारेल. पण पुनश्च सुरु करताना मराठीतील पहिले सशुल्क digital नियतकालिक आपण काढत आहोत एवढाच विषय होता. पण जसजसा वाचक वर्ग वाढू लागला, त्यांच्याशी संवाद होऊ लागला त्यावेळी जाणवलं की वाचकांची आपल्याकडून एवढीच अपेक्षा नाहीये. जुन्या चांगल्या साहित्याच्या उप्पर त्यांना अजून निरनिराळ्या विषयांमध्ये रस आहे. त्यांना असं साहित्य पुनश्च सारख्याच तंत्र व्यासपीठावर थोडी किंमत मोजून वाचायचं आहे. आता समोरून जर तयारी असेल तर मग आपण पण आपल्या बाजूने आपली तयारी वाढवली पाहिजे. या भावनेतूनच जन्माला आलं 'बहुविध.कॉम'. एक मल्टीकॅटेगरी platform. असे तंत्र व्यासपीठ ज्यावर पुनश्च प्रमाणेच इतरही डिजिटल नियतकालिके चालू शकतील. जुनं सोडून नवीन स्वीकारणं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यात मानवी प्रयत्न, पैसे गुंतलेले असतात पण याशिवाय ज्या भावना गुंतलेल्या असतात त्यांचे व्यवस्थापन जोखमीचे. आधी वाटायचं की पुनश्च website आणि app आपण वेगळंच ठेवू. बहुविध.कॉम वर इतर नियतकालीकांना घेऊ. पण यातून आपण पुनश्च च्या वाचकाला अधिक गोंधळात पाडणार आहोत हे दिसायला लागलं. पुनश्च वरील लेख वाचायला एक website आणि app, बाकी लेख वाचण्यासाठी दुसरं. म्हणून मग सरळ पुनश्च वरून बहुविध वर शिफ्ट होण्याचा कठीण निर्णय घेतला. सुदैवाने आता पुनश्चच्या वाचकांचा सर्व data, username/password सकट, bahuvidh.com वर आला आहे. पुनश्च चे वाचक सहज या नवीन साईटवर login करू शकतील असं दिसल्यावर आता पुनश्च आणि बहुविध या दोन गोष्टी एकत्र चालवणे शहाणपणाचे नाही हे ध्यानात घेऊन आजपासून पुनश्च ही website आणि app आम्ही inactive करत आहोत. यापुढे काही दिवस पुनश्च website/app सुरु ठेवू आणि लवकरच तेदेखील बंद करू. तेदेखील यासाठी की वाचकांचा गोंधळ कमी व्हावा. आशा आहे पुनश्च चे सर्व वाचक ही गोष्ट समजून घेतील आणि आमच्याप्रमाणे लवकरच bahuvidh.com वर रुळतील. कुठलाही बदल करणे जितके कठीण तितकेच तो अंमलात आणणे आणि स्वीकारणे त्याहून कठीण. सूर्यासाठी कालपासून आणि पुनश्च च्या वाचकांसाठी आजपासून सुरु झालेल्या या संक्रमणात आपण सोबत आहोतच. काही तक्रार, अडचण असेल तर आपला ९१५२२५५२३५ हा whatsapp नंबर आहेच.

संपादकीय , पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया

  1. Nilkanthkesari

      5 वर्षांपूर्वी

    आभार..

  2. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    All the best

  3. smrutijoshi

      6 वर्षांपूर्वी

    वरील नंबरwhatsappवर टाकाल का?

  4. smrutijoshi

      6 वर्षांपूर्वी

    मस्त वाटतय

  5. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    आभारी

  6. avthite

      6 वर्षांपूर्वी

    Thanks Sir for always being there to help..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen