संपादकीय- जो जे वांच्छिल तो ते लाहो !!

संपादकीय    किरण भिडे    2019-04-06 06:00:42   

मार्च महिना संपला. दहावी-बारावी च्या परीक्षा संपल्या. आता एप्रिल-मे हा खरा तर सुट्ट्यांचा हंगाम. पण यावेळी तो लोकसभा निवडणुकांनी झाकोळला जाणार आहे. सुट्टीत कुठे जायचं याच्या चर्चेपेक्षा मोदींचे काय होणार याची अधिक उत्सुकता लोकांना आहे. भारतीय लोकशाहीच्या पहिल्या निवडणुका  १९५१-५२ मध्ये झाल्या होत्या. आपण पुनश्च च्या माध्यमातून विशेष संशोधन करून त्या काळात प्रसिद्ध झालेल्या निवडणूक संबंधी लेखांमधून ३ लेख निवडून ते आपल्या वाचकांपर्यंत आणत आहोत. त्यातील पहिला लेख 'निवडणूक उमेदवार कसा असावा?' हा आपण जशा निवडणुका जाहीर झाल्या तसा प्रसिद्ध केला. याही महिन्यात त्यासंबंधी अजून २ लेख आपण प्रसिद्ध करणार आहोत. कालसुसंगत साहित्य देण्याचा आपला प्रयत्न असाच सुरु राहणार आहे. शिवाय दर आठवड्याला एक अधिकचा लेख ध्वनिमुद्रित ( ऑडीओ ) करून देणार आहोत. हाही एक नवीन प्रयोग असेल... जसा मार्च महिना संपलाय तसं आपलं आर्थिक वर्षही संपलंय. १ जानेवारीला आपले पहिले सभासदत्वाचे वर्ष संपले. तेव्हापासून ३१ मार्चपर्यंत जवळपास तीनशे जणांनी आपले सभासदत्व नुतनीकरण केले आहे. पुनश्च ते बहुविध हे संक्रमण, त्यात पुन्हा बहुविध वर इतर सशुल्क नियतकालिके, त्यांचे सभासदत्व अशा बदलांनी आपला वाचक भांबावून गेला नसेल तर नवल. तरीही एवढ्या सगळ्यांनी आपल्यात पुन्हा विश्वास दाखवला याबद्दल सगळ्यांचे आभार. आता या गेल्या १५ महिन्यांच्या अनुभवानंतर आपण काही निष्कर्षास पोचलो आहोत. आजच्या या संपादकीयातून ते तुमच्यासमोर ठेवत आहोत. १. मागे आपण जे सर्वेक्षण केले त्यानुसार ९०% वाचकांना बहुविध वरील सर्व लेख वाचता येतील असे सभासदत्व सोयीचे वाटत आहे. ५% वाचक सध्या जे चाललंय त्यात सुखी आहेत तर ५% वाचक दोन्ही पर्याय उपलब्ध हवेत या मताचे निघाले. म्हणजे साधारण ९५% वाचकांना बहुविध चे एक सभासदत्व (ज्यात सर्व लेख वाचता येतील) हवे आहे. या मताचा आदर करून  काही दिवसात तसे एक सर्वसमावेशक सभासदत्व आणता येईल. पण हे सर्व आता जरा पूर्ण विचार करून करूया. कारण हा मोठा बदल असणार आहे. यावरील मतमतांतरे जाणून घेऊया. पण एक ध्यानात ठेवा आपण कोणाचेही ( वाचक आणि नियतकालिके चालवणारे संपादक ) नुकसान होऊ देणार नाही. त्यामुळे त्याबाबतीत निर्धास्त राहा. यासंबंधी काय प्रगती होत्ये ते कळवत राहूच. २. ज्या वाचकांचे सभासदत्व संपले आहे त्यांना ते सहज कळत नाहीये. त्याचे नुतनीकरण पण सुलभ नाहीये. त्यात सुधारणा करून बदल केलेले android app आणि या बदलामुळे लांबलेले ios app लवकरच उपलब्ध करू. ३. या बदलांना सामावणारा युजर इंटरफेस आता बनवला जाईल. यावेळी सौरभ करंदीकर म्हणून यातील तज्ञ आहेत त्यांची मदत घेत आहोत. ४. अजून एक खूप महत्वाचे. मराठीतील काही नामवंत प्रकाशकांनी ( राजहंस, पॉप्युलर, ज्योत्स्ना, मौज, रोहन आणि कॉण्टिनेंटल ) एकत्र येऊन एक marathi reader नावाची कंपनी सुरु केली होती. त्याद्वारे इ बुक्स देण्याचा त्यांचा मानस होता. ४-५ वर्ष झाली या गोष्टीला. या कंपनीचा वेग वाढवण्यासाठी आपण त्यात सामील व्हावे असा प्रस्ताव आहे. मराठी साहित्य, त्यासमोरील येणाऱ्या काळाचे आव्हान आणि त्यावर डिजिटल माध्यमातून आपण शोधत असलेले उत्तर हे मुद्दे समान असल्याने आपण त्यात रस दाखवला आहे. त्यासंबंधी काय प्रगती होत्ये ते कळवेनच. ५. या सगळ्यासाठी आता पैसे लागणार , ते उभे करण्याचे plans आहेत. यासंबंधी भविष्यात अधिक सांगूच. तसंही आता मराठी नववर्षास प्रारंभ होईल. या वर्षी सभासदसंख्या वाढवण्याचा संकल्प केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने आणि शुभेच्छांनी तो पूर्ण होईलच, तुमचेही सर्व संकल्प पूर्ण होवोत. नववर्षाच्या भरपूर शुभेच्छा !! संपर्कात राहूया...

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. mukundmk

      5 वर्षांपूर्वी

    आजही माझ्यासारखे काही जुनी मासिके, विशेषांक, कात्रणे जमवणारे भेटतात. आताशा ही सवय कालबाह्य होत असली व कालपरात्वे नामशेषही होणार असली तरी जमवलेल्या या साठ्याचे काय करावे ? याचे काही समाधानकारक उत्तर मिळावे ही अपेक्षा.

  2. VinayakP

      5 वर्षांपूर्वी

    काहीसा उशिरा प्रतिसाद देतोय त्याबद्दल क्षमस्व. बहुविधला तसेच बहुविध च्या संपूर्ण टीम ला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मराठी रीडर बद्दल वाचून खूपच आनंद झाला. पुढील बातमी साठी वाट पाहत आहे. ज्या उत्साहाने आणि सातत्याने आपण ह्या उपक्रमात नवनवीन गोष्टी आणत आहेत त्याचं खरच कौतुक वाटतं. शुभेच्छा.

  3. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    नक्कीच. तो विचार प्रामुख्याने केला जाईल...खात्री बाळगा.

  4. gondyaaalare

      5 वर्षांपूर्वी

    नव्याने करण्यात येणारे बदल निवृत्तांकरता user friendly तसेच pocket friendly असावेत .

  5. Shyam

      5 वर्षांपूर्वी

    खूप चांगला उपक्रम आहे . मसाप पण जुनी पुस्तके मोफत डाउनलोड करण्याची सोय देणार आहे असे वर्तमानपत्रात वाचले . फक्त वयोमानानुसार ह्या सर्व सोयी आम्हाला वापरता यायला हव्यात . मराठी भाषा टिको आणि वाढो ! धन्यवाद !

  6. Bpriyanka

      5 वर्षांपूर्वी

    नववर्षाभिनंदन

  7. Rashmi

      5 वर्षांपूर्वी

    नुतन वर्षाभिनंदन...

  8. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    नववर्षाच्या शुभेच्छा !

  9. bharatik64

      5 वर्षांपूर्वी

    नुतन वार्षाच्या आपल्याला वआपल्या टिम ला खुप खुप शुभेच्छा.

  10.   5 वर्षांपूर्वी

    नूतन वर्षाभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

  11. krmrkr

      5 वर्षांपूर्वी

    व्यक्तिगत सभासदत्व संपत येण्याच्या एक महिना आधी सभासदाला तसा निरोप पाठवण्याची व्यवस्था करावी. मला व्यक्तीशः संपूर्ण सभासदत्व घेण्यात रस आहे. नव्या वर्षात अनेक नवे उपक्रम सुरू कराल अशी आशा आहे. लोभ आहेच वृध्दी असावी ही या शुभदिनी विनंती.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen