बहुविध.कॉम हा अभ्यासू संपादकांनी चालवलेला चौकस आणि अभिरूचीसंपन्न वाचकांसाठीचा सशुल्क ऊपक्रम आहे. त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती विविध विषयांचे, दुर्मिळ आणि दर्जेदार लेख प्रयत्नपूर्वक शोधून वाचकांना देणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे तर बहुविध.कॉमचे स्वरुप एखाद्या लिटरेचर मॉल सारखे आहे. ‘बहुविध’मध्ये प्रवेश करताच साहित्यविषयक वेगवेगळी दालने दिसतील . त्यापैक सर्व दालनांमधून अथवा आपल्या आवडीच्या विषयाच्या निवडक दालनांतून तुम्ही साहित्य वाचनाचा सशुल्क आनंद घेऊ शकता. माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". अर्थातच तो आजच्या काळातला असल्याने ऐकणे, पाहणे (म्हणजे ऑडिओ फाईल्स, व्हीडिओ फाइल्स) यांच्या माध्यमातून आवश्यक असेल तेव्हा आशयाला अधिक भक्कम करण्याची सोयही यात आहे.

डिजिटल माध्यमातून लक्षावधी वाचकांशी एकाचवेळी थेट ऑनलाइन संपर्कात राहता येते. वाचकांच्या प्रतिक्रिया लगेच लेखक-संपादकांपर्यत पोचतात. आपल्या लेखनाचे आर्थिक मूल्य थेट लेखकापर्यंत पोचवण्याचा मराठीतील हा पहिलाच प्रयोग आहे. "सशुल्क डिजिटल नियमित लेखांचा पुरवठा" असे पूर्णपणे वेगळे स्वरूप असलेला हा अभिनव प्रयोग आहे. छापील साहित्याच्या आणि सोशल मिडीयाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे - बहुविध.कॉम!

बहुविध.कॉम हे इंटरनेटमधून माहितीचा भडीमार करणारे पोर्टल नाही. निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांपर्यंत पोचवणे व त्यातून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे हा बहुविधचा मुख्य उद्देश आहे. बहुविध.कॉम वर साहित्य वाचायचे, ऐकायचे किंवा बघायचे असल्यास सभासदत्व आवश्यक आहे. या सभासदत्वाचे खालीलप्रमाणे दोन प्रकार आहेत.

बहुविध सर्व!स्वतंत्र सदरांचे सभासदत्व
सर्व
Price: ₹500.00
बहुविध.कॉम वर संपादकनिहाय सदरं असून प्रत्येकाचे स्वतंत्र सभासदत्व देखील उपलब्ध आहे. आपल्या पसंतीचे एक किंवा त्याहून जास्त नियतकालिकांचे सभासदत्व आपण घेऊ शकता. शिवाय नंतर बहुविध सभासदत्व अपग्रेड करता येते. सदराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सदराच्या आयकनवर क्लिक करा. तिथूनही सभासदत्व घेता येते.

पुनश्च
रुपवाणी
वयम्
अंतरंग

*सर्व सभासदत्व वार्षीक मुदतीची असून वर्षाअखेरी ती नूतनीकृत करावी लागतात..