बहुविध.कॉम हा अभ्यासू संपादकांनी चालवलेला चौकस आणि अभिरूचीसंपन्न वाचकांसाठीचा सशुल्क ऊपक्रम आहे. त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती विविध विषयांचे, दुर्मिळ आणि दर्जेदार लेख प्रयत्नपूर्वक शोधून वाचकांना देणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे तर बहुविध.कॉमचे स्वरुप एखाद्या लिटरेचर मॉल सारखे आहे. ‘बहुविध’मध्ये प्रवेश करताच साहित्यविषयक वेगवेगळी दालने दिसतील . त्यापैक सर्व दालनांमधून अथवा आपल्या आवडीच्या विषयाच्या निवडक दालनांतून तुम्ही साहित्य वाचनाचा सशुल्क आनंद घेऊ शकता. माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". अर्थातच तो आजच्या काळातला असल्याने ऐकणे, पाहणे (म्हणजे ऑडिओ फाईल्स, व्हीडिओ फाइल्स) यांच्या माध्यमातून आवश्यक असेल तेव्हा आशयाला अधिक भक्कम करण्याची सोयही यात आहे.

डिजिटल माध्यमातून लक्षावधी वाचकांशी एकाचवेळी थेट ऑनलाइन संपर्कात राहता येते. वाचकांच्या प्रतिक्रिया लगेच लेखक-संपादकांपर्यत पोचतात. आपल्या लेखनाचे आर्थिक मूल्य थेट लेखकापर्यंत पोचवण्याचा मराठीतील हा पहिलाच प्रयोग आहे. "सशुल्क डिजिटल नियमीत लेखांचा पुरवठा" असे पूर्णपणे वेगळे स्वरूप असलेला हा अभिनव प्रयोग आहे. छापील साहित्याच्या आणि सोशल मीडियाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे - बहुविध.कॉम!

पुनश्च सभासदत्व
मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पुनश्च’.
Price: ₹250.00
Details
गेल्या १५० वर्षातील हजारो मराठी नियतकालिके चाळून त्यातील निवडक लघुलेख तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आणि तेही पूर्ण विनामूल्य.
Price: ₹0.00
Details
दीर्घा सभासदत्व
दीर्घलेखांची ही मालिका खरंच 'खऱ्या' वाचकाला समाधान देईल अशीच आहे. साधारण लेख हे २००० शब्दांचे असतात. त्याहून मोठ्या लेखांना न्याय देण्यासाठी हा विभाग सुरु केला आहे.
Price: ₹200.00
Details
निवडक दिवाळी २०१८
डिजिटल माध्यमातून निवडक दिवाळी अंकातील वेचक साहित्य वाचनवेड्यांपर्यंत नेण्याचा उपक्रम म्हणजे निवडक दिवाळी २०१८.
Price: ₹200.00
Details
इ ग्यान-की
नव्या आणि जुन्या उत्तमोत्तम पुस्तकांना वाचकांसमोर आणणारा हा डिजिटल उपक्रम म्हणजे ' इ-ग्यान-की'. या अंतर्गत दर आठवड्याला एक म्हणजे दर महिन्याला चार ते पाच पुस्तकांचा परिचय देणारे लेख सभासदांना डिजिटल माध्यमातून वाचता येतील.
Price: ₹0.00
Details
सिनेमॅजिक
मराठी, हिंदी,आणि जागतिक चित्रपटांच्या जगात नियमित घेऊन जाणार आहे, ‘सिनेमॅजिक’ हे पहिलेच डिजिटल सशूल्क नियतकालिक.
Price: ₹300.00
Details

सदर पर्याय शक्यतो वापरू नका. आपण जर सभासदत्व घेण्याचा प्रयत्न केला असेल व पैसे भरताना किंवा भरल्यावर आपल्याला अडचण आली असेल, मेल आल्या नसतील किंवा आपले सभासदत्व काही कारणास्तव अर्धवट कार्यान्वित झाले असेल तर खालील फॉर्म भरायची घाई करू नका. आम्हाला bahuvidh18@gmail.com वर संपर्क करा.

केवळ निशुल्क सभासदत्वासाठी!

बहुविध.कॉम वर अवांतर सदरातही अनेक वाचनीय लेख उपलब्ध आहेत. "फक्त अवांतर सदरातील" लेख वाचायला नि:शुल्क नोंदणी करणे पुरेसे आहे. खालील फॉर्म भरून आपण तात्काळ नि:शुल्क सभासदत्व घेऊ शकता. भविष्यात ह्याच अकाउंटवर सशुल्क सभासदत्वही घेता येतील.


Close Menu