पानशेतचे दिवस

जडण-घडण    दीपक मोडक    2021-08-21 18:00:01   

अंक  : जडण-घडण जुलै २०२१ कोयना काठ - भाग ११ सीझनला सुरुवात होताच कंपनीने दोन्हीही पॉवरहाऊसची कामं जोमाने सुरू केली. वरसगावच्या पॉवर हाऊसचं काम सुरु होऊन रखडताना मी रोजच पाहत होतो. सांडव्याच्या लगत डाव्या तीरावर पॉवर हाऊस होतं आणि त्याची एकूण मांडणी धरणाला समांतर होती. म्हणजे सांडव्याच्या लगत डाव्या तीरावर पायथ्याशी धरणाबाहेर आलेला पेनस्टॉक, बल्कहेड लाऊन बंद केलेला होता. तेथे मशीनहॉलचा खड्डा येणार होता. त्याच्या डाव्या बाजूला सर्व्हिस-बे होता आणि त्याच्याही पलीकडे डाव्या बाजूला नियंत्रण कक्षाला आवश्यक असणारी ऑझिलरी बिल्डिंग होती. मशीन पिटचा खड्डा खोदण्यासाठी आधी नदीच्या बाजूने डाव्या तीरावर रँप बनवायला सुरुवात झाली. हाच रस्ता पुढे पॉवरहाउस मधून बाहेर पडणारे पाणी नदीला सोडण्यासाठी टेल-चॅनेल म्हणून वापरला जाणार होता. मशीनपिट खुदाई कठीण खडकात पाच मीटर असणार होती. मात्र सर्व्हिस-बेची पातळी तिथल्या जमीनपातळीला ठेवल्यामुळे ती मशीन हॉलच्या तळाच्यावर नऊ मीटर येणार होती. म्हणजेच मशीन हॉलच्या पलीकडच्या दगडी थराच्या वर पाच मीटर माती भराव्यावर सर्व्हिस-बे असणार होता. आणि सर्व्हिस-बे फ्लोअरच्या आधाराच्या कॉलमचं फाउंडेशन चार मीटर मातीत खोदाई करून कठीण खडकावर ठेवावं लागणार होतं. यासाठी छोट्या जेसीबी सारखं मशीन आणून मातीच्या भरावात रोज तीन साडेतीन मीटर खोदाई केली जाई. दुसर्‍या दिवशी सकाळी येईपर्यंत त्या खड्ड्यात बाजूची माती ढासळून पडलेली असे. याप्रकारे खोदाईचा उद्योग काही दिवस चालला. आणि मग हताश होऊन निकम साहेबांनी तो नाद सोडला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण-घडण जुले २०२१ , अनुभव कथन , विज्ञान-तंत्रज्ञान
अनुभव कथन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen