नाइन्टीन एटीफोर : एक टिपण


वसंत आबाजी डहाके

जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती, आणि आज 2020 सालीही ती समकालीनच आहे. 1949मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, 36 वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल, काहींना 36 वर्षांनंतरच्या जगाची नव्हे तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. 1984 नंतरच्या 36 वर्षांमध्ये ही कादंबरी 1984च्या आसपासची केवळ नव्हे तर कालच्या-आजच्या, 1985 पासून 2020 पर्यंतची आहे असेही पुष्कळ वाचकांना वाटल्याचे दिसलेले आहे. गेली सत्तर वर्षे ही कादंबरी लोकांच्या नुस्त्या स्मरणात नव्हे तर वाचनात आहे. कारण कोणत्याही काळातल्या वाचकाला ती आपल्याच आजच्या काळाचा आलेख दाखवणारी आहे असे वाटलेले आहे. हिटलरशाही, स्टॅलिनशाही, धार्मिक हुकूमशाही या वस्तुस्थिती आहेत आणि त्यांचीच रूपान्तरे जगात अनेक ठिकाणी गेल्या

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , दिवाळी अंक २०२०
भाषा

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      2 वर्षांपूर्वी

    सुंदर शब्दांकनवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen