रूपक? नव्हे, चिरंतन सत्य!!


अंक : ललित दिवाळी २०२०

जॉर्ज ऑर्वेल याच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीनं इतिहास घडवला. ही कादंबरी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाली, ती 1945 सालामध्ये. म्हणजेच यंदाचं वर्ष हे या इतिहास घडविणार्‍या कादंबरीचं अमृत-महोत्सवी वर्ष आहे. गेल्या पाऊणशे वर्षांमध्ये जगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला. माणसाच्या आयुष्याची गती पालटली. त्याची जीवनशैली बदलली. जीवनाच्या मूल्यांमध्ये फरक झाला. सुख, समाधान, ऐश्वर्य, यश यांच्या संकल्पना उलट्यापालट्या झाल्या. विज्ञानातील प्रगतीनं तर माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. या प्रदीर्घ काळात जगभरात अनेक युद्धं झाली. सोव्हिएत युनियनची शकलं उडाली. चीननं आपल्या भोवती निर्माण केलेल्या बांबूच्या अभेद्य तटबंदीला खिंडारं पडली. भांडवलशाहीला कडवा विरोध करणार्‍या चीननं अमेरिकेसह अनेक देशांशी व्यापारीसंबंध निर्माण केले आणि जगाची बाजारपेठ काबीज करण्याच्या दिशेनं पाऊलं टाकायला सुरुवात केली... असे कितीतरी बदल झाले. पण जॉर्ज ऑर्वेलनं आपल्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीमध्ये सांगितलेलं सत्य अधिकाधिकच ठळक होत गेलं. 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२० , पुस्तक परिक्षण
भाषा

प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! जवळ जवळ 30 वर्षांपूर्वी कादंबरी वाचलेली. कथेचा नेटका गोषवारा, हे पुस्तक लिहिण्यामागची Orwell ची भूमिका आणि हे साहित्य प्रकाशित झाल्यावर त्याच्या आयुष्यात झालेले बदल हे सगळंच उत्तमपणे आलंय लिखाणात.🙏



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen