श्री. पु. आणि राम पटवर्धन

ललित    अनंत देशमुख    2021-01-13 16:46:44   

ललित, दिवाळी अंक २०२०

‘मौज प्रकाशना’ची पुस्तकं त्यांच्या गुणात्मकते-मुळे, सौंदर्यदृष्टीमुळे आणि निर्दोष छपाईमुळे - या प्रकाशनाने जो वाचकवर्ग निर्माण केला होता त्यात - प्रिय ठरली. ती नावाजली गेली आणि दिवस जसजसे जाऊ लागले तसतसा प्रकाशनाचा वेग मंद असला तरी ती नियमितपणे प्रकाशित होऊ लागली. समाजातील विचक्षण वाचकांमध्ये त्यांना मान्यता मिळू लागली. त्याचा परिणाम असा झाला की दूरवरून लेखकमंडळी आपली हस्तलिखितं ‘मौज’कडे पाठवू लागली. प्रकाशनाला उशीर झाला तरी चालेल, पण ‘मौज’चा शिक्का त्यावर असायला हवा ही लेखकांची दृढ भावना होत गेली. शिवाय पुस्तक प्रकाशित झाल्यावर ‘सत्यकथे’त त्याचे परीक्षण आले तर त्या लेखकाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटू लागले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , दिवाळी अंक २०२०
भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.