छायाचित्रणाचा प्रारंभकाळ

ललित    दीपक घारे    2021-02-15 12:00:00   

ललित, दिवाळी अंक २०२०

‘छायाचित्रण ः तंत्र की कला’ हा आता वादाचा विषय राहिलेला नाही. कला म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. पण छायाचित्रकलेला एक सामाजिक बाजू आहे. कारण छायाचित्रे ही इतिहासाचा विश्वासपूर्ण साक्षीदार म्हणून राहिलेली आहेत. 1857 पासून ते 1947 पर्यंतचा भारतीयांचा स्वातंत्र्यलढा, दोन महायुद्धे, सामाजिक-राजकीय चळवळी आणि दुष्काळ तसेच भोपाळच्या विषारी वायुगळतीसारख्या मानवनिर्मित दुर्घटना अशा अनेक घटितांचा कॅमेरा साक्षीदार राहिलेला आहे. छायाचित्रं ही मानवी आशा-आकांक्षांचा, सांस्कृतिक वर्तनाचा दस्तावेज आहेत.

पार्था मित्तर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिशांच्या वासाहतिक राजवटीत भारताच्या दृश्यकला संस्कृतीत मोठे बदल घडून आले, जे मोगलकालीन दृश्यकलेच्या संकेतांपेक्षा वेगळे होते. या सर्जनशील वृत्तीबदलाला तीन घटक कारणीभूत होते - व्हिक्टोरियन अ‍ॅकेडेमिक चित्रशैली, मुद्रणपद्धती आणि छायाचित्रकला. यांपैकी यथार्थवादी अ‍ॅकेडेमिक चित्रशैलीने ‘राजा रविवर्मा’ आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑङ्ग आर्ट’च्या चित्रपरंपरेला जन्म दिला. मुद्रणपर्वाने प्रबोधनकाळात नवे सामाजिक विचार रुजवण्यास मदत केली आणि ओलिओग्राङ्ग तसेच शिळामुद्रणाच्या तंत्राने रविवर्माची आणि अन्य चित्रकारांची चित्रे घरोघरी पोहोचवली. छायाचित्रकला आणि मुद्रणतंत्र यांच्या संयोगाने हे शक्य झालं. मात्र अ‍ॅकेडेमिक शैली आणि मुद्रण यांच्या तुलनेत छायाचित्रकलेच्या तिसर्‍या घटकाच्या योगदानाची दखल योग्य त्या प्रमाणात घेतली गेलेली नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , दिवाळी अंक २०२०
इतिहास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...