मराठीसाठी माहिती अधिकाराचे दिव्य! (भाग - २)


माहितीच्या अधिकाराचा समाजोपयोगी कामांसाठी वापर नवीन राहिलेला नाही. विविध प्रकारच्या समाजकार्यासाठी, अन्यायनिर्मूलनासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराचा विधायक दृष्टी ठेवून प्रभावीपणे वापर करणारे कार्यकर्ते खूप आहेत. ह्या अधिकारामुळेच प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर चव्हाट्यावर आली, जी एरवी येऊ शकली नसती. ह्या अर्थाने माहिती अधिकार हे एक वरदानच ठरले आहे. कधी कधी शासकीय, प्रशासकीय कामातील अकार्यक्षमता, ढिलाई, वेळकाढूपणा यांची पोलखोल करण्यासाठीही माहितीच्या अधिकाराचा वापर केलेला दिसून येतो. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ह्या अधिकाराचा वापर मराठी भाषेच्या चळवळीसाठी केला. त्यांचे त्या संदर्भातील अनुभव माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि मराठीच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठीच्या मुलखात मराठी भाषेचे प्रत्यक्षात काय चालले आहे, शासन मराठीसाठी काय केल्याचे भासवते आहे आणि शासनाच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी प्रशासन माहितीशी कसे खेळते आहे हे पाहाणे जितके उद्वेगजनक तितकेच मनोरंजकही आहे. आनंद भंडारे यांनी मराठी भाषेसाठी केलेले माहिती अधिकाराचे हे दिव्य त्यांच्याच शब्दांत आम्ही क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत... (पुढे वाचा)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

               अशीही सुनावणी

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , भाषा

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    मांजरेकर बाई, तुमचं अगदी खरंय! या प्रश्नावर आपला मराठीचा प्राध्यापक वर्ग जरी एकवटला तरी कितीतरी गोष्टी सोप्या होतील. पण हाच वर्ग मराठीच्या प्रश्नापासून पळू पाहतो आहे. आणि ते पळणं कुठल्याही तर्काने विचार केला तरी माझ्यासारखीच्या आकलनाच्या पल्याडचं आहे.

  2. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    आपण सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल आपले मनपूःर्वक आभार! आपला संपर्क क्रमांक ९९८७७७३८०२ या क्रमांकावर पाठवल्यास आपण फोनवर सविस्तर बोलू शकू.

  3. Prita patil

      5 वर्षांपूर्वी

    महाराष्ट्रातच मराठी भाषेला न्याय व महत्व मिळण्यासाठी नवसायास करावे लागतात यापेक्षा नामुष्कीची कोणती गोष्ट नाही.मराठी भाषा सक्तीची वा ती एक भाषा माध्यम म्हणुन तिला न्याय मिळणे हा तिचा हक्कच आहे. तोही झगडून प्राप्त करावा लागतो. त्यासाठी आपले काही बांधवच तो प्रयत्न यशस्वी करु देत नाही. म्हणजे करू शकणारी मदतही ते करत नाही. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे सारख्या कळकळीने झगडणा-या व्यक्तीला पाठींबा देणे व त्यांच्या स्तुत्य प्रयत्नांना साथ देणे प्रत्त्येक मराठी भाषा प्रेमीचेच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्त्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्यच आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. टीमला जितके सहकार्य करतात येईल तेवढे मी नक्की करेन

  4. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मराठीसाठी रेटा लावण्यासाठी किती चिकाटी लागते आहे ...आणि किती वेळ जातो आहे ...पण लक्षात कोण घेतो !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen