भाषेला निरुपयोगी ठरविण्यासाठी आमची चढाओढ!


"या सगळ्यामुळे एक पद्धत म्हणून आम्हाला जन्माला आल्यापासूनच आमच्या भाषेचा बिगरप्रेम अभिमान होता. तिची उपयुक्तता कळण्याइतकी दूरदृष्टी त्या वयात विकसित झालेली नसल्याने लवकरच आम्हाला ह्या प्रेमहीन उद्योगाचा कंटाळा यायला लागला. मग भाषा म्हणजे कटकट वाटायला लागली. तिच्या नियमांची कटकट, व्याकरणाची कटकट, शब्दांच्या अर्थाची कटकट, त्या अर्थाच्या छटांची कटकट, उच्चारांची कटकट! एकूणच, शब्दांच्या भाषेचा व्यवहारच नकोसा झाला. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांनी आणि उलथापालथींनी हे नकोसेपण अधिकच टोकदार केले. आम्हीच आमच्या भाषेला चढाओढीने निरुपयोगी ठरवायला लागलो. तिच्या मृत्यूची भाकिते वृत्तपत्रांमधून, चर्चासत्रांमधून वारंवार वाचायला-ऐकायला मिळू लागली. मराठी कोमेजत चालली, मरगळून गेली. आम्ही म्हणालो, 'नाही तरी भाषेला अंत असतोच ना!' म्हणजे तसा तिचा अभिमान वगैरे आम्हाला अजूनही आहेच, त्याची काही अडचण नाही पण त्यासाठी भाषा जिवंत असायला हवी ही कसली चमत्कारिक अट? बरेच झाले, 'मेली तर मेली, कटकट गेली, उद्या मरायची ती आजच मेली!’ तिला जगवण्याचा उद्योग करून कुणाला काय मिळणार? मग तिला तशीच सोडून आम्ही दुसऱ्या एका उपयुक्त भाषेचा पदर धरला. अर्थात त्याही भाषेवर प्रेम करायला आम्हाला नाहीच शिकवले गेले." आपल्या समाजाच्या भाषेविषयीच्या मानसिकतेबद्दल सांगताहेत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ माधुरी पुरंदरे...

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    मर्मभेदक पण वास्तव लेख.

  2. Nishikant

      5 वर्षांपूर्वी

    चला आपल्या मुलांना,नातवंडांना मराठीची गोडी लाऊ या!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen