मुलांमध्ये भाषेची समज घडवताना...


"मुलं वाचत नाहीत, मुलांचा मराठी विषय कच्चा आहे, मुलांना चार वाक्ये धड शुद्ध मराठीतून लिहिता-वाचता येत नाहीत अशा अनेक तक्रारी आपल्याला ऐकू येत असतात. पण माझ्या अनुभवातील चित्र नेमके याच्या उलट आहे. पुस्तकांवर तुटून पडणारी, चांगली  भाषिक समज असलेली, आपले विचार मुद्देसुदपणे लिहून-बोलून मांडू शकणारी आणि उत्तम कल्पनाशक्ती असलेली मुलं माझ्या अवतीभवती आहेत. असे चित्र सर्वत्र निर्माण होणे अगदीच शक्य आहे, अर्थात त्यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. माझ्या सुदैवाने भाषा शिक्षणात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांचे विचार समक्ष अथवा वाचनातून माझ्यापर्यंत पोहोचले. Active Teachers Forum  सारख्या शिक्षणासाठी तळमळीनं काम करणाऱ्या गटाने माझ्यातील प्रयोगशीलतेला नेहमी प्रेरणा दिली आहे. वर्षाताई सहस्त्रबुद्धे यांची मी विशेष ऋणी आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाषा शिक्षक म्हणून मला अधिक समुद्ध होता आले आहे." गुळवंच - सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या मनिषा उगले आपल्या शाळेतील वाचन उपक्रमांविषयी सांगतायत - 

--------------------------------------------------------------------------------------------

एखादी भाषा शिकवणं म्हणजे केवळ त्या भाषेचं त्या इयत्तेसाठी ठरवून दिलेलं पाठ्यपुस्तक शिकवणं नसतं, यावर आपल्या सर्वांचचं एकमत होईल. भाषा ही बहुपदरी संरचना असून तिचे वेगवेगळे पैलू लक्षात घेत ती शक्य तितक्या सहजपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान शिक्षकापुढे असते. आपले विच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पालकत्व

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    शेवटचा उतारा इंट्रो म्हणून सुरुवातीला वेगळ्या शाईत घेतला आहे. आपले सभासद नसलेल्यांनाही तो वाचता येतो.

  2. ajitbmunj

      5 वर्षांपूर्वी

    पहिल्या उताऱ्यातील काही ओळी शेवटच्या उताऱ्यात पुन्हा आल्यात का??

  3. jgajanan

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख आवडला

  4. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    लेख चांगला. उपक्रम चांगले पण महाविद्यालयात आलेल्या मुलांनाही वाचता येत नाही ...त्यांना वाचनाची आवड कशी लावावी ?

  5.   5 वर्षांपूर्वी

    खूप छान उपक्रम !मुलांना बोलतं करणं .शब्द व बालगीतांचा संग्रहवाढवण. चर्चेतून आत्मविश्वास वाढणं धीट पणे स्वतःच म्हणंण मांडता येणं.यासाठी शिक्षकांचे प्रयत्न व भिषीक कौषल्य विकासातील विविध प्रयोग आमल आणणे.अत्यंत अनुकरणीय आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen