माणूस म्हणून घडण्यासाठी!


लहानग्या वयात परक्या भाषेत मुळाक्षरे गिरवताना होणाऱ्या मुलांच्या मानसिक कोंडमाऱ्याची गोष्ट सांगतायत शिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे - 

---------------------------------------------------------------------------------

बिट्टू. छानसा गोड मुलगा. गेली दोन महिने  त्याच्या वागण्यातला बदल काळजी लावून होता. सहज भटायला गेले तेव्हा तो म्हणाला होता, “आत्या आज मी शाळेत जाणार नाही.” “का रे?”, माझ्या डोळ्यांत काळजी दाटून आली. गेलं वर्षभर बिट्टूच्या वागण्यातला बदल मला जाणवत होता. बिट्टू आता हायर केजीत शिकत हेता. शाळेत न जाण्याचं कारण काय असावं?” “आज माझी परीक्षा आहे.” बिट्टूच्या चेहऱ्यावर भीती होती. “मग तर तू शाळेत जायलाच हवंस, बिट्टू.” “नको ना आत्या. मी ‘ढ’ आहे. मला काहीसुद्धा येत नाही.”

बिट्टूच्या शब्दांनी माझ्या काळजात लक्कन हललं. असला कसला हा शब्द वापरला याने! ‘ढ’, ‘हुशार’ या शब्दांचा अर्थ तरी कळलाय का याला? वहिनींशी बोलायला हवं. माझ्या मनात खळबळ उडाली होती. वसंताचे दिवस असतानाही मला ग्रीष्मातील उष्णता जाणवत होती. दिवस उदास गेला. मनात बिट्टूचं ‘ढ’ रुतून बसलं होतं.

मागे एकदा बिट्टू आणि मी खरेदीला गेलो होतो. दुकानात गर्दी होती. दोघं पायरीवर बसलो. नुकताच १ ते १०० अंक तो शिकला होता. “बिट्टू, आपण दोनचा पाढा तयार करू या का?” “चालेल.” “दोन अधिक दोन बरोबर किती?” “चार.” “चार अधिक दोन बरोबर कि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पालकत्व

प्रतिक्रिया

  1. Rajeshvaze

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर..

  2. Nishikant

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen