कृषी प्रदर्शनात भरली 'मराठी शाळा'


मराठी शाळांसाठी शासन काही करो अथवा न करो, गावोगावच्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांनी मात्र स्वेच्छेने मराठी शाळांसाठी वाहून घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नुकत्याच भरलेल्या कृषी प्रदर्शनामधील मराठी शाळांचे दालन हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. असे प्रयत्न प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात व्हायला हवेत असेच कुणालाही वाटेल. मराठी शाळांतील आपल्या शिक्षकबांधवाच्या अशाच एका उपक्रमाविषयी सांगतायत जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक भाऊसाहेब चासकर - 

-----------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये राबवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक उपक्रम समाजासमोर आणण्यासाठी अकोले तालुक्यातील शिक्षकांनी तेथील कृषी प्रदर्शनात ‘आपली शाळा - मराठी शाळा’ हे दालन सजवले होते. डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षकांनी आपल्या शाळांमधल्या विविधांगी उपक्रमांचे मोठ्या पडद्यावर व्हिडीओ डॉक्युमेंटरीज, मुलाखती, इंग्रजी शिकवण्यासाठी सुरू असलेले प्रयोग दाखवत लक्षवेधक सादरीकरण केले. ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण’ अशा आशयाची प्रचार पत्रके चर्चेचा विषय ठरला.  चार दिवसांत सुमारे दोन लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. मराठी शाळांच्या या दालनास भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण

प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    Nice

  2. संजय रत्नपारखी

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय सुत्य उपक्रम आहे.

  3.   5 वर्षांपूर्वी

    खूपच प्रेरणादायी आणि प्रभावी कार्य..असे धाडस मराठी शाळांसाठी केलेच पाहिजे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen