चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग - एक)


प्रवासात एखादं मनाजोगं पुस्तक वाचण्यात आपण गुंग असतो अन् नायकाच्या संवादातल्या एखाद्या अनोख्या शब्दाशी आपण अडतो. अर्थ सांगेल असा कुणी जाणकारही जवळ नसतो. शब्दकोश असतो,  पण तो घरी! अशी वेळ आपल्यांपैकी अनेकांवर आली असेल. शब्दार्थांपर्यंत पोहचण्याची आपली ही जिज्ञासा रोखून धरण्याची आता अजिबात आवश्यकता नाही. शब्दार्थ पाहण्याची सोय आता आपल्या स्क्रीनवरही उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर या लेखातून असाच एक डिजिटल  शब्दकोश आपल्यासमोर उलगडतोय -

एकविसाव्या शतकाला ‘तंत्रज्ञानाचे युग’ म्हटले जाते. आपली मराठी भाषाही तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगत झालेली आहे.  संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणकावरील काम हे फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित होते, पण नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने मराठीमध्ये सुद्धा संगणकाचा वापर होऊ लागला आणि दिवसेंदिवस हा वापर वाढत आहे, ही गोष्ट सुखावणारी आहे. एकेकाळी हातात  घेऊन वाचले जाणारे पुस्तक आपण आता मोबाइल, टॅब्लेट, डेस्कटॉप, लॅपटॉप यांच्या स्क्रीनवर वाचायला लागलो आहोत. या स्क्रीनवरील वाचनात एखादा शब्द अडला, त्याचा अर्थ समजून घ्यावासा वाटला तर मात्र तो ऑनलाइन पाहण्याची सोय नव्हती; त्यासाठी एकतर आपल्या संग्रही शब्दकोश असणे आवश्यक होते किंवा फार तर एखाद्या भाषा जाणकाराला विचारणा करावी लागे. आता मात्र आपल्याला स्क्रीनवर म्हणजे ऑनलाइन अशा अडलेल्या शब्दांचे अर्थ  शोधता येणार आहेत.

संबंधित लेखः-

मराठी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा , मराठी बृह़़द्कोश

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    खूप उपयुक्त माहिती आणि लेख

  2. saleelk

      4 वर्षांपूर्वी

    नमस्कार. मी ह्या कोशाच्या संबंधात वर्तमानपत्रांना एक पत्र लिहिले होते. ह्या संकेतस्थळावरील वाचकांच्या माहितीसाठी त्याची प्रत वर दिलेली आहे. (सलील कुळकर्णी)

  3. साधना गोरे

      4 वर्षांपूर्वी

    आपला हा अभिप्राय 'बृहत्कोशा'च्या निर्मात्यापर्यंत नक्की पोहचवू.

  4. saleelk

      4 वर्षांपूर्वी

    प्रिय संपादक यांसी, सप्रेम नमस्कार. दि० xxxx च्या अंकातील बृहद्‌कोशाबद्दलच्या बातमीच्या संबंधात काही विचार मांडतो. कोशवाङ्मय हा कुठल्याही भाषेच्या जोपासनेच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक असतो. त्या दृष्टीने काही मंडळींनी मिळून मराठीभाषेच्या प्रेमाखातर अत्यंत उत्साहाने शिकागो विद्यापीठाच्या https://dsal.uchicago.edu/dictionaries/ ह्या संकेतस्थळावरून विद्यमान तीन मराठीतील शब्दकोशांचे संकलन करून बृहद्‌कोशाची निर्मिती केली ही प्रशंसनीय आणि आनंदाची घटना आहे. तिन्ही कोश जसेच्या तसे कॉपी-पेस्ट करून घ्यायचे ठरवल्यामुळे संकलकांनी मराठी (आणि संस्कृत) भाषेच्या विद्वानाची मदत घेतली नसावी. परंतु त्यामुळे कोशात अनवधानाने शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या काही चुका राहून गेलेल्या दिसत आहेत. कोशातील शब्द आणि त्यांचे अर्थ हे सामान्यतः प्रमाण मानले जातात. त्यामुळे ते पूर्णतः बिनचूक असण्याची खबरदारी संकलकांनी घेणे अत्यावश्यक आहे. बृहद्‌कोशाच्या बाबतीत सर्वप्रथम लक्षात येते की ‘बृहद्‌कोश’ हे कोशाचे नावच चुकीचे आहे. तो शब्द मराठीच्या आणि संस्कृतच्या संधिनियमांप्रमाणे ‘बृहत्कोश’ असा हवा. (उदा० बृहत्कथा) कोशातील ‘बृहत्’ शब्दाचा उतारा तपासल्यावर दिसते की तो दाते-कर्व्यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातून कॉपी-पेस्ट करून घेतल्यामुळे शुद्ध लिहिला गेला आहे. त्या उतार्‍यात पुढे ‘बृहत्‌’ शब्दाच्या संबंधातील काही सामासिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. ते योग्यच आहेत. पुढचा ‘बृहत’ ह्या शब्दाचा उतारा मोल्स्वर्थ यांच्या कोशातून जसाच्या-तसा घेतला आहे. खरे तर मोल्स्वर्थनी दिल्याप्रमाणे ‘बृहत’ असा अकारान्त शब्द मराठीत अस्तित्वातच नाही. दाते-कर्व्यांच्या कोशात दिल्याप्रमाणे मूळ शब्द ‘बृहत्’ असा (व्यंजनान्त) आहे. तो ‘बृहत’ असा स्वरान्त असता तर मोल्स्वर्थनी पुढे दिलेले संधिशब्द (बृहच्छरीर, बृहदुदर, बृहदंड, बृहत्कथा, बृहदुर) तसे तयार झालेच नसते. प्रथमग्रासे मक्षिकापातः झाल्यामुळे मी आणखी खोलात गेलो नाही. पण शब्दार्थांचे ज्ञानभांडार खुले करून देणार्‍या शब्दकोशाचे भाषेच्या संवर्धनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता असा शब्दकोश पूर्णतः बिनचूकच असायला हवा, हे कोशाचे भाषाप्रेमी संकलकही मान्य करतील. त्यासाठी संकलकांनी संपूर्ण बृहद्‌कोश कोणातरी योग्य विद्वान व्यक्तीकडून तपासून घ्यावा, अशी मी एक मराठीभाषाप्रेमी म्हणून त्यांना कळकळीची विनंती करू इच्छितो. क०लो०अ० आपला नम्र, सलील कुळकर्णी (कोथरूड, पुणे)

  5. pranavs

      4 वर्षांपूर्वी

    सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर करावा.. जास्तीत जास्त वाचन करावे.. शब्दाच्या अर्थाच्या बाबतीत शब्दकोशांचा वापर करावा.. तसेच या सदरातील काही लेखांचा उपयोग होईल आपल्याला.

  6. kmrudula

      4 वर्षांपूर्वी

    मराठी भाषा अधिक चांगली होण्यासाठी काय पर्याय वापरावेत

  7. Shivani laxamn mashalkar

      4 वर्षांपूर्वी

    या लेखातुन आपण चागंल्या गोष्टि विचारात आणू शकतो...........

  8. Shivani laxman mashalkar

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुदंर अस लेख आहे......

  9.   4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख! कुतुहल पूर्ण करणारी माहिती

  10. Rdesai

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान उपयुक्त उपक्रम !

  11. विजय

      4 वर्षांपूर्वी

    छान उपयुक्त उपक्रम आहे....उपयुक्त माहीती..

  12. jspalnitkar

      4 वर्षांपूर्वी

    हा एक खूप चांगला प्रकल्प आहे....आणि लेखात लिहिल्याप्रमाणे 'उचापत' शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा लेखही लगेच वाचण्याची उचापत केली...रंजक माहिती आहे...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen