भाषाविचार- भाषेची वसाहत आणि वाताहत (भाग-१)


'आपल्या हयातीत आपल्या भाषा मरत नाहीत, तर पुढचा विचार आपण का करावा? आणि त्यासाठी आपण रक्त का आटवावं?' असा सोयीचा पण आत्मघातकी विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेतच. अशा लोकांना स्वातंत्र्यलढ्याची उदाहरणं देऊन भागणारं नाही. कारण स्वातंत्र्याचा फायदा काय हे जसं अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही, तसंच एखादी भाषा जगण्याचा फायदा काय, हे ती भाषा जगवत-वाढवत राहिल्याशिवाय कळत नाही" 'भाषाविचार' सदरातून 'भाषेची वसाहत आणि वाताहत'बद्दल सांगतायत डॉ. दीपक पवार -

---------------------------------------------------------

जगभरात भाषेचा विचार करणाऱ्या लोकांमध्ये जे अनेक मतप्रवाह आहेत, ते भाषाविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विखुरले गेले आहेत. उपयोजित भाषाविज्ञान, सामाजिक भाषविज्ञान व ऐतिहासिक भाषाविज्ञान ही त्यातली प्रमुख दालनं आहेत. या विचारांमध्ये जगभर सातत्याने पडत असलेली भर लक्षात घेतली की, माणसाचं मन बावचळून जाईल अशी परिस्थिती आहे. ‘भाषा प्रवाही असतात, जगतात-मरतात, राहतात-जातात', अशी एक निष्काम कर्मयोगाची भावना एखादी विचारप्रणाली मांडते. तर 'भाषांचा, बोलींचा मृत्यू ही दखलपात्र गोष्ट आहे' असं मानणारा एक समृद्ध विचारप्रवाह आहे. आपल्या अवतीभोवती अनेक विचारप्रवाहांचे लोक वावरताना दिसतात. भाषांचं बदलणारं रूप, त्यांच्यातले संख्यात्मक, मूल्यात्मक आणि गुणात्मक बदल सगळ्यांना कळतातच असं नाही; किंवा कळले तरी महत्त्वाचे वाटतातच असं नाही. या पार्श्वभूमीवर 'भाषेचा मृत्यू' ही संकल्पना समजावून घेऊ या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , भाषा

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    खूप छान अभ्यास व विचार करायला लावणारा लेख.

  2. pvanashri

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख

  3. सुयोग पवार

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान👌👌👍 याचे पुढचे भाग लवकर प्रकाशित करा…

  4.   4 वर्षांपूर्वी

    फारच माहितीपूर्ण व प्रबोधनापर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen