शब्दांच्या पाऊलखुणा - पण घोंगडी मला सोडत नाही (भाग - तेरा)


गेल्या पाचेक महिन्यांपासून आपण सगळेच टाळेबंदीत आहोत. या काळात जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याचदा समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका संवादात ते म्हणाले की, “आमची तयारी आहे करोनासोबत जगायची, पण करोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? करोना तयार नसेल तर आपण कसे काय त्याच्या सोबत जगणार?”आणि मग सानेगुरुजींचा श्याम आणि त्याची आई यांच्यातील संवादापासून ते  तयारी नसणाऱ्या कितीतरी गोष्टी या विधानाच्या चालीवर  गुंफायला सुरुवात झाली. सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या विधानांनी काही काळ महाराष्ट्रीय जनतेची करमणूक केली. नवल म्हणजे नेमक्या याच अर्थाची, पण किचिंतशी वेगळ्या धाटणीची घोंगडीवरील एक म्हण मराठीत आहे. त्या म्हणीकडे जाण्याआधी हे घोंगडं नेमकं कोणत्या भाषेतून मराठीत आलंय हे पाहू...

---------------------------------------------

‘काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं मलाबी जतरंला येऊ द्या की रं’ हे धनगरी गीत दादा कोंडके यांनी महाराष्ट्रभर गाजवलं. कपाळभर भंडारा, खांद्यावर घोंगडं अन् हातात त्याच्याच उंचीची काठी घेतलेल्या रांगड्या धनगराचे स्वप्नाळू चित्रण मराठी चित्रपट आणि काही प्रमाणात साहित्यानेही दीर्घकाळ रंगवले. मेंढ्या पाळणाऱ्या धनगराने मेंढ्यांच्याच लोकरीपासून तयार केले जाणारे घोंगडे पांघरणे साहजिक आहे, पण धनगर समाज घोंगडे विणत नाही, तर ते काम सणगर समाजात केले जाते. महाराष्ट्रातील सर्वच धनगर कर्नाटकातील मायाक्क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Rdesai

      4 वर्षांपूर्वी

    छान माहितीपूर्ण लेख!

  2. चिन्मयी सुमीत

      4 वर्षांपूर्वी

    किती सुंदर लेख. ' भिजत घोंगडे' हे किती सर्रास वापरतो आपण. पण त्यामागची ही कहाणी किती रोचक आहे... घोंगड्याला एक विशिष्ट गौध असतो. तो चिंचोक्याच्या खळीचा असावा, हे आता कळलं. किती जवळच नांदत असतात ह्या गोष्टी पण त्यांबद्दल माहित नसते आपल्याला काही...धन्यवाद ह्या लेखाबद्दल.

  3. Dr. Mahalaxmi Morale

      4 वर्षांपूर्वी

    आमच्या घरी घोंगड होते. खळ्यावर राखणीला गेलं की आजी घोंगडी पांघरायची. खूप उपदार घोंगडी होती.

  4. purnanand

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख ! लहानपणी कोकणात पावसाळ्यात घोंगडी वापरत होतो ते आठवले ॰ संबंधित म्हणा उद्बोधक

  5. Rdesai

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर माहिती !

  6. rsanjay96

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर आणि औचित्यपूर्ण लेखन आहे. वाक्यप्रचार म्हणी यांचा संबंध व्यावसायिकता आणि जगण्याशी अधिक आहे. मराठी जीवनातील बहुतेक म्हणी यातूनच तयार झालेल्या आहेत. 'नाचता येईना अंगण वाकडे' किंवा 'पी हळद आणि गोरी' या दोन्ही म्हणीतून अधिक स्पष्ट दिसते. डॉ. संजय रत्नपारखी.

  7. rvkale27

      4 वर्षांपूर्वी

    छान

  8. pvanashri

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen